नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राणी गणना ३ जून रोजी

308 Views

          गोंदिया, दि.1 :-  नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील वन्यप्राणी गणना व निसर्गानुभव ३ जून २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आल्याची माहिती उपवनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, नवेगांव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, गोंदिया यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

5 मे 2023 रोजी बुध्दपोर्णिमेच्या दिवशी पानवठ्यावरील वन्यप्राणी गणना निसर्गानुभव राबविणे प्रस्तावित होते. मात्र बुध्दपोर्णिमेच्या सप्ताहात सलग पाऊस येत असल्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने 5 मे 2023 रोजीचे निसर्गानुभव रद्द करण्यात आला होता. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी 3 जून 2023 रोजी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पानवठयावरील वन्यप्राणी गणना निसर्गानुभव कार्यक्रम-2023 राबविण्याबाबत परवानगी दिलेली आहे. त्या अनुषंगाने दिनांक 3 जून 2023 रोजी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पानवठयावरील वन्यप्राणी गणना निसर्गानुभव कार्यक्रम-2023 राबविण्यात येत आहे.

  निसर्गानुभव कार्यक्रम-2023 अतंर्गत 3 जून 2023 रोजी फक्त दुपारी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पिटेझरी, मंगेझरी, चोरखमारा-1, चोरखमारा-2, चंद्रपूर (कोका) व नागझिरा सकुंल (FDCM Quota) या पर्यटक गेटचे आरक्षण बंद ठेवण्यात आलेले आहे.

          वरील दिनांकास दुपारच्या फेरीत ज्या पर्यटकांनी पर्यटनाची आगावू बुकिंग केलेली असेल त्यांना आरक्षणाची रक्कम परत करण्यात येईल. 4 जुन 2023 रोजी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील पिटेझरी, मंगेझरी, चोरखमारा-1, चोरखमारा-2, चंद्रपूर (कोका) व नागझिरा सकुंल (FDCM Quota) या प्रवेशव्दारावरून सकाळी 6 वाजता पासून पर्यटन सुरु होईल.

तसेच 3 जून 2023 रोजी नागझिरा सकुंल परीसरात मुक्कामाने आरक्षण केलेल्या पर्यटकांना सायंकाळी 6 वाजेपर्यंत अभयारण्यात प्रवेश दिला जाईल, यांची पर्यटकांनी नोंद घ्यावी. असे उपवनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक, नवेगांव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र, गोंदिया यांनी कळविले आहे.

Related posts