जांभुरटोला/आसोली, ख़ुर्शीपार येथे धान खरेदी केंद्राचे उदघाटन..
आमगांव.(30मे)
आधारभूत धान खरेदी केंद्रावर विक्री करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान व गैरसोय होणार नाही यांची संचालक मंडळाने दखल घ्यावी. केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगले प्रयत्न व प्रगत काम करत आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल शासकीय दराने खरेदी करता यावा यासाठी धान खरेदी वाढविण्यात येत आहे. संस्थेने धान खरेदीवर अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि त्यांना लाभ देण्यासाठी काम केले पाहिजे असे उदगार उद्घाटक म्हणून जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डाँ. परिणय फुके यांनी व्यक्त केले.
श्री फुके 29 मे रोजी महाराष्ट्र स्टेट को-आपरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशन मुबंई अंतर्गत प्रमोद शेतकरी बहु. कृषि सहकारी संस्था मर्या. जांभुरटोला, आसोली आणि श्रध्येय सोनवाने गुरुजी शेतकरी कृषि सह. संस्था ख़ुर्शीपार तालुका आमगांव येथील धान खरेदी केंद्राचे उद्घघाटना प्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाची अध्यक्षता कृषी उत्पन्न बाजार समिती आमगावचे सभापती केशवभाऊ मानकर यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे प्रदेश सचिव व माजी आमदार संजय पुराम, माजी आमदार भेरसिंगभाऊ नागपुरे, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष विजयभाऊ शिवणकर, भाजपचे जिल्हा महामंत्री वीरेंद्र अंजनकर, जि.प. सभापती संजय टेभंरे, आदिवासी नेते शंकर मडावी, जिप सदस्य हनुवंत वट्टी, जांभुरटोला संस्था अध्यक्ष विनोद चौधरी, प्रमोद चौधरी भाजपचे परसराम फुंडे, माजी सभापती श्रावण राणा, काशीराम हुकरे, सुभाष आकरे, सुनील अग्रवाल उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात विघ्नहर्ता श्री गणेश, माँ गायत्री देवी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्राचे पूजन दीपप्रज्वलन व माल्यार्पण करून करण्यात आले. तत्पशाचात काटा पूजन करून शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यात आले.
याप्रसंगी मोठया संख्येने धान उत्पादक शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी दोनही संस्थेचे संचालक, विनोद चौधरी, राजू शरणागत, प्रमोद चौधरी, पंकज बाबाड़े, इंद्रराज सोनवाने, इंदु चौधरी, शितलताई शरणागत, राजुभाऊ बघेले, श्री बोपचे जी, आदि ने परिश्रम घेतले.