215 रुग्णांनी नि:शुल्क अस्थिरोग तपासणी व दंतरोग तपासणी शिबीराचा घेतला लाभ

131 Views

 

प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने

तुमसर:-प्रद्युम्न नर्सिंग होम तुमसर द्वारे नि:शुल्क अस्थिरोग तपासणी, हाडांचे घनत्व व दंतरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . दि 28 मे 2023 रोज रविवारला सकाळी 10 वाजेपासून दुपारी 4 वाजेपर्यंत डॉ गादेवार यांचे प्रद्युम्न नर्सिंग होम मेन रोड,विनोबा भावे नगर,तुमसर येथे 215 रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला..या शिबिरात मशिनद्वारे हाडांमधिल कॅल्शियम च्या प्रमाणाची तपासणी केल्या गेली.कंबर दुखी, संधिवात, सायटिका,सांधेदुखी, स्पॉंडीलायटिस्ट ,दातांच्या व हिरड्यांच्या रोगांवर मोफत निदान व उपचार करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन इंजि.प्रदीप पडोळे यांच्या हस्ते पार पडले. सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉ निकेत ठोंबरे, डॉ श्वेता ठोंबरे- सुप्रसिद्ध डेंटल सर्जन व इम्प्लॉटोलॉजिस्ट,सुप्रसिद्ध सर्जन डॉ मधुसूदन गादेवार,सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ व मधुमेहरोग तज्ञ डॉ प्रद्युम्न गादेवार ,राहुल डोंगरे ,श्यामराव ठोंबरे, कुंदा ठोंबरे यावेळी उपस्थित होते.आमदार राजुभाऊ कारेमोरे यांनी शिबिराला भेट देऊन अश्या उपक्रमाची आज समाजाला नितांत गरज आहे अशी हितगुज केली. अस्थिरोग तज्ज्ञ डॉ निकेत ठोंबरे म्हणाले की,जेव्हा रुग्ण आमच्याकडे येतो तेव्हा तो रडवलेल्या चेहऱ्यानो येतो.जातो तेव्हा काहीसा समाधानी असतो.ही भावना फारच अप्रतिम असते. आरोग्य शिबिराच्या माध्यमातून रुग्णाची सेवा करायला मिळणे ही माझ्यासाठी अविस्मरणीय बाब आहे.समाजाचे माझ्यावर अनंत उपकार असून त्याची मी आजीवन परतफेड करीत राहणार असे प्रांजळ मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.शिबिराचे संचालन व आभारप्रदर्शन राहुल डोंगरे यांनी केले.

Related posts