भंडारा APMC निवडणुकीत सभापतीपदी भाजपचे विवेक नखाते, उपसभापतीपदी शिंदे गटाचे शिवसैनिक नामदेव निंबार्ते यांची निवड

407 Views

 

माजी पालकमंत्री डॉ.फुके यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी विजयाबद्दल व्यक्त केला हर्ष..

भंडारा. 22 मे
भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या सभापति-उपसभापति निवडणूक मध्ये, सभापती पदासाठी भाजपचे विवेक नखाते यांची निवड झाली, तर उपसभापतीपदी शिवसेनेचे शिंदे गटाचे नामदेव निंबार्ते यांची निवड झाली.

भंडारा कृषि उत्पन्न बाजार समितितील भाजप आणि शिंदे गटाच्या संचालक मंडळाच्या सभापति व उपसभापतीपदी निवड झाल्याबद्दल जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी आनंद व्यक्त केला की, ही विजय यशस्वी उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचा हा ग्रामीण पातळीवर व शेतकऱ्यांच्या हितासाठी शुरू सार्वजनिक विकास कामांच्या अभूतपूर्व प्रयत्न आहे.

या विजयाच्या आनंदादरम्यान क्षेत्राचे खासदार सुनील मेंढे, भाजप जिल्हाध्यक्ष शिवराम गिर्‍हेपुंजे, आमदार नरेंद्र भोंडेकर, राजेंद्र जैन, सुनील फुंडे, शिशुपाल पटले, बाळा भाऊ काशिवार, धनंजय दलाल, विनोद बांते, टिळक वैद्य, प्रशांत खोब्रागडे, संजय कुंभलकर, डॉ. अनिल गायधने, भगवान बावनकर, भगवान चांदेवार, मुन्ना पुंडे, प्रशांत निंभुळकर, संदीप भांडारकर, सचिन कुंभलकर आदींसह भाजप व शिवसेना (शिंदे गट) पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts