भंडारा: जिल्हास्तरीय युवा उत्सवाचे जुन महिन्यात आयोजन

137 Views

 

प्रतिनिधि:- तुषार कमल पशिने

भंडारा, दि. 16 मे : नेहरू युवा केंद्राद्वारे आझादी का अमृत महोत्सव वर्षाच्या निमित्ताने जिल्हास्तरीय युवा उत्सवाचे आयोजन जुन महिन्यात करण्यात यणार आहे. स्वातंत्र्य संग्रामातील देशभक्तीची भावना वृंदगीत करणे आणि तरूण युवक कलावंतांना व्यासपीठ निर्माण करून देण्याच्या उद्देशाने चित्रकला, कविता लेखन, छायाचित्र, भाषण स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम व जिल्हा युवा संमेलन ‘भारत@2047’ युवा संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

या स्पर्धेतील विजेत्यांना स्पर्धकांना रोख बक्षीस स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. चित्रकला, कविता लेखन व छायाचित्र स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम रूपये 1 हजार, द्वितीय रूपये 750 व तृतीय रूपये 500 बक्षीस ठेवण्यात आले आहे. जिल्हास्तरीय भाषण स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम रूपये 5 हजार, द्वितीय रूपये 2 हजार व तृतीय बक्षीस 1 हजार ठेवण्यात आले आहे. जिल्हास्तरीय विजेते राज्यस्तरासाठी व राज्यस्तरीय विजेते राष्ट्रीय स्तरावरील भाषण स्पर्धेकरिता पात्र राहातील.

स्पर्धेत सहभागी होण्याकरिता 17 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पवनी येथे 9156107704, 7350685934 या क्रमांकावर तसेच शिवाजी विद्यालय, लाखांदूर येथे 9518530486, 8999138052 व औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मोहाडी येथे 7447266239, 8767231093 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा युवा अधिकारी हितेंद्र वैद्य यांनी कळविले आहे.

Related posts