गोंदिया: डॉ.मंगला कटरे अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित..

1,017 Views

 

गोंदिया –
येथील राजीव गांधी समाजकार्य महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.मंगला कटरे यांना नुकतेच जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

सदर पुरस्कार महिला व बालविकासाच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्‍या महिलां व संस्थांच्या पाठीवर कौतुकाची थाप पाडावी व त्यांच्या कामाला राजमान्यता मिळावी या उदात्त हेतुने शासनाच्या वतीने अहिल्यादेवी होळकर हा पुरस्कार देण्यात येतो.

डॉ.मंगला कटरे यांनी मागील अनेक वर्षापासून समाजकार्य क्षेत्रात विविध समाजोपयोगी कार्य करीत आहेत.त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेवून महाराष्ट्र शासनाने हा पुरस्कार देवून गौरव केला. गोंदिया येथे आयोजित भव्य कृषी महोत्सवामध्ये जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुरस्कार प्राप्त झाल्यांनतर मनोगत व्यक्त करतांना केलेल्या समाजकार्याचा हा सन्मान एक आशीर्वाद आहे. यामुळे मला एक नवी प्रेरणा मिळाली असुन भविष्यात नव्या जोमाने समाजातील तळागाळातील लोकांना मदत करण्याचे काम करण्याचे माझे प्रयत्न असतील असे सांगितले.

पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल प्रा.बी.बी.येळे लोकसेवा कनिष्ठ महाविद्यालय कोसमतोंडी, डाँ. खुशालचंद्र बोपचे माजी खासदार, इंजिनीरिंग विजय पी. कटरे, सौं.आध्यपिका सरु वी. कटरे, सौं ममता चौधरी, सौं.रेखा कटरे, समुपदेशक कोटुंबिक कोर्ट भंडारा ,सौं.उषा पटले तिमेझरी, सौं.शकून टेंभरे आमगाव ,श्री.आनंद पटले, राजीव गांधी समाज कार्य महाविद्यालय गोंदिया, सौं.संजना पटले डेपो. मॅनेजर गोंदिया, इंजि. सौरभ वी कटरे ,डाँ. दिक्षा कटरे ,इंजि. विवेक बी. येळे, डाँ.मेघा बी येळे, सौं. मेघा ठाकरे, सौं.उन्नती बुरले, सौं. दीपा रहांगडाले,सौं. नूतन तितीरमारे,एन.एम.डी महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डाॅ.बबन मेश्राम सह परीवारातील सदस्य,मित्र-मैत्रीनी, विद्यार्थी यानी अभिनंदन केले.

Related posts