451 Views
प्रतिनिधि। (31 मार्च)
गोंदिया। आज दिनांक ३१/०३/२०२३ रोजी विशेष सत्र न्यायालय, गोंदिया यांने बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी नामे सोमेश्वर अंबुले, वय ४७ वर्षे, रा.ता. आमगाव, जि. गोंदिया, यास १० वर्षाचा सश्रम कारावास व २५,०००/- रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.
सदर प्रकरण असे की, आरोपी नामे सोमेश्वर अंबुले याने दिनांक ३०/०१/२०१६ ला दुपारी २.०० वाजताच्या सुमारास पिडिता वय ०६ वर्षे हिला आपल्या राहते घरी बोलावुन तिला पाणी आणण्यास सांगुन तिच्या मागे घरात जावून
तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला होता. सदरची हकीकत पिडीतेने तिच्या
आई व बहिणीजवळ सांगितली. यावरून पिडीतेच्या आईने तिचे पती घरी आल्यावर
दिनांक १८/०२/२०१६ पो.स्टे आमगाव येथे आरोपी विरूध्द तक्रार दाखल केली
होती. सदर फिर्यादीच्या तक्रारीवरून तत्कालीन तपासी अधिकारी जगदिप काटे, सहा.
पोलीस निरिक्षक, पो.स्टे. आमगाव यांनी सविस्तर तपास करून आरोपीविरूध्द दोषारोप
पत्र सादर केले होते.
सदर प्रकरणात आरोपीविरूध्द दोष सिध्द करण्यासाठी सरकार/पिडित पक्षातर्फे विशेष सरकारी वकील कृष्णा डी. पारधी यांनी एकुण ५ साक्षदारांची साक्ष न्यायालयासामोर नोंदविली.
एकंदरित आरोपीचे वकील व सरकारी वकील यांचे सविस्तर युक्तीवादा नंतर मा. न्यायालय श्री.ए. टी. वानखेडे प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश, गोंदिया जि.गोंदिया यांनी आरोपी विरूध्द सरकारी पक्षाचा पुरावा ग्राहय धरून आरोपी नामे सोमेश्वर अंबुले, वय ४७ वर्षे, ता. आमगाव, जि. गोंदिया, यांस भारतीय दंड विधानाचे कलम ३७६(२–एफ,आय) अंतर्गत १० वर्षांचा सश्रम कारावास व रूपये २५,०००/- दंड
व दंड न भरल्यास ६ महिन्याचा अतिरिक्त कारावास अशी शिक्षा ठोठावली. सदर दंडाची रक्कम पिडितेला देण्याचे आदेशित केले.
सदर प्रकरणात पोलीस अधिक्षक निखिल पिगंळे व अप्पर पोलीस अधिक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनात तसेच पोलीस निरिक्षक दिपक हांडे यांच्या देखरेखीत पैरवी कर्मचारी म.पो. शि. श्री. सुनिल बावनकर पो.स्टे आमगाव व यांनी उत्कृष्ठ काम पाहिले.