तुमसर: पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी..

145 Views

 

तुषार कमल पशिने।

भंडारा:-तुमसर तालुक्यातील खरबी येथे लग्न समारंभात जेवन करून घराकडे जात असलेल्या महिलेवर एका भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला करुन गंभीर जखमी केले. ही घटना २० मार्चच्या रात्री दहा वाजता दरम्यान घडली. यमुना महादेव नरखेडे (६५) रा. खरबी असे जखमी महिलेचे नाव आहे. ही महिला घराकडे जात असताना रात्री अचानकपणे पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला व गालाचा चावा घेऊन गंभीर जखमी केले. त्या कुत्र्याने काही वेळाने माया ठवकर नामक महिलेवर सुध्दा हल्ला करुन चावा घेतला व जखमी केले. गुलाब गोमासे यांच्या मालकीच्या पाळीव जनावरांनाही चावा घेऊन जखमी केले. एवढेच नाही तर परसवाडा येथील एका युवकांवर सुध्दा हल्ला करुन जखमी केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नागरिकांत व पशूपालकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related posts