माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते दत्तोरा येथिल जत्रेचे विधीवत पूजन करुन शुभारंभ

189 Views

 

गोंदिया। आज गुडीपाडव्याच्या पावन पर्वावर भंगाराम बाबा देवस्थान (उद्यान) परिसर दत्तोरा येथे भंगाराम बाबा जत्रा (मेला) चे आयोजन करण्यात आले. भंगाराम बाबा जत्रेचे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते विधीवत दिप प्रज्वलन व पूजन करण्यात आले.

गावात निघणाऱ्या प्रभात फेरीला श्री राजेंद्र जैन यांनी झेंडी दाखवून जत्रेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी आमदार श्री जैन यांनी सर्व भाविक भक्तांना नवरात्रीच्या व गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी सर्वश्री माजी आमदार राजेंद्र जैन, जगदीश बहेकार, तुलसीराम शिवणकर, दुलीचंद भाकरे, इंद्रराज शिवणकर, सुरेश चुटे, सुनील पटले, दिलीप ऊके, दुलीचंद ऊके, विनोद हेमने, सुरेखा कोरे, मीताराम कोरे, घनश्याम शिवणकर, बंडू कापसे, नंदलाल कावड़े, भैयालाल साठवणे, गुणवंत मेश्राम, गणपत महारवाडे, एसराम कोरे, देवानंद कावड़े, गुड्डू कावड़े, गौरव बिसेन सहित समस्त गावकरी उपस्थित होते.

Related posts