माजी मंत्री फुके यांचे प्रयत्न : वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या कुणबी समाजाच्या जमिनीचा प्रश्न 15 दिवसांत निकाली निघाला..

492 Views

 

महसूल व वनविभागाच्या तावडीत अडकलेली शासकीय जागा समाजाला उपलब्ध करून दिल्याबद्दल कुणबी संघटनेने मानले डॉ.परिणय फुके यांचे आभार..

नागपूर.
नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्‍यातील डोंगरला गावातील महसूल व वनविभागाच्या ताब्यातील जमिनीसाठी कुणबी समाज संघटनेने समाज भवनासाठी अनेक वर्षांपासून मागणी केली होती, मात्र ही जमीन कुणबी समाजाला मिळू शकली नाही.

याप्रकरणी कुणबी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी माजी वन राज्यमंत्री डॉ.परिणय फुके यांची 6 मार्च रोजी भेट घेऊन हा प्रश्न त्यांच्यासमोर मांडून तोडगा काढण्याची मागणी केली होती.

या प्रकरणाची त्वरीत दखल घेत माजी मंत्री डॉ.परिणय फुके यांच्यासह कुणबी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी नागपूर व उप वनसंरक्षक नागपूर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सुपूर्द करून डोंगरला येथील शासकीय पड़ित जमीन कुणबी समाज भवनाच्या बांधकामासाठी कुणबी समाज संघटनेला देण्याची विनंती केली होती.

या प्रकरणाची तातडीने दखल घेत जिल्हाधिकारी नागपूर यांनी माजी मंत्री श्री फुके यांना आश्वस्त करून संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले होते.

या जमिनीच्या प्रकरणावर आज कुणबी सेवा संस्थेला मौजा डोंगरला येथील वन परिमंडल ईसापुर सर्व्हे क्रमांक 214 अंतर्गत येणाऱ्या एकूण 6.36 जामिनीतून 0.96 शासन जमीनाच्या पट्टा अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वनहक्क मान्यता) अधिनियम 2006 ची कलम 3(2) अन्वये उल्लेखित “(ड) सामाजिक केंद्र प्रयोजन अंतर्गत देण्याचे मंजूरी पत्र देण्यात आले.

कुणबी समाजाच्या जमिनीचा विषय प्रशासकीय स्तरावर मंजूर होताच डॉ.परिणय फुके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून कुणबीं समाजाच्या समाज भवन (कम्युनिटी हॉल) साठी शासनस्तरावर निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे हे विशेष.

या जमिनीचा विषयाला माजी वन राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या प्रयत्नाने अवघ्या 15 दिवसात सोडवून शासन द्वारे कुणबी समाजाला दिल्याबद्दल आणि या जमिनीवर समाज भवनासाठी शासन स्तरावर निधि ची मांगनी केल्याबद्दल समाजाने श्री फुके यांचे आभार मानले.

यावेळी श्री.राजू डेहनकर, श्री.समीर उमप, श्री.जयंतराव टालाटुले, श्री.नितीन डेहनकर, श्री.राजू हरणे, श्री.प्रकाश वसू, कुणबी सेवा संस्था, काटोल (जि. नागपूर) चे अध्यक्ष श्री. रमेश फिरके, श्री.अशोकराव काकडे, श्री.सुधाकर सांभारतोडे, श्री.रमेश पोद्दार, श्री.संजय भोंडे, श्री.विठ्ठलराव काकडे, श्री.विजय धोटे, श्री.सुनील राऊत, श्री.स्वप्नील राऊत, श्री.संदीप सरोदे, श्री.संदीप वंजारी, श्री.अनिकेत अंतुरकर,श्री.नीलिमाताई अरसडे आदींनी श्री.फुके यांच्या परिश्रमाचे कौतुक करून अभिनंदन केले.

Related posts