गोंदिया, 9 मार्च
शहरात कामानिमित्त विविध ठिकाणी वावरणार्या महिलांकरिता पे अँड यूज धर्तीवर सार्वजनिक ठिकाणी 15 दिवसात शौचालय बांधकाम करावे, अन्यथा नगर परिषदेसमोर आंदोलन करण्याचा इशारा भाजपा महिला मोर्चाच्या वतीने निवेदनातून देण्यात आला.
नपचे मुख्याधिकारी करण चव्हाण यांना निवेदनानुसार, शहरात सार्वजनिक शौचालय नसल्याने महिलांची मोठी कुचंबना होता. शहरातील रेलटोली परिसरातील महाराण प्रताप बाग, जयस्तंभ चौक, बाजारपेठ, बंगाली शाळा या परिसरात विविध शासकीय, निमशासकीय कार्यालय असल्याने महिलांची मोठी वर्दळ राहते. मात्र याठिकाणी सार्वजनिक शौचालय नसल्याने महिलांची कुचंबना होते. त्यामुळे या परिसरात 15 दिवसात सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करावे, अन्यथा नगर परिषद कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात दिला आहे. निवेदन देताना शहर भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष निर्मला मिश्रा, महामंत्री धर्मिष्ठा सेंगर, शालिनी डोंगरे, शुभा भारद्वाज, अनिता मेश्राम, अॅड. हेमलता पतेह, मौसमी सोनछात्रा, रती चौहान, पद्मा गौतम, सरिता सोनवाने, निलिमा सोलंकी, रजनी टिकारिया, तारा तिडके, रजनी चांदेवार, अंजू सरजारे, निलिमा माणिकपुरी, वैशाली चंदेल, अंजली भैसारे, करुणा श्रीवास्तव, मैथुला बिसेन, अॅड. सरिता कुलकर्णी पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.