खा. प्रफुल पटेल यांचे कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी – माजी आमदार राजेंद्र जैन

328 Views

 

तिरोडा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ची सभासद नोंदणी आढावा बैठक संपन्न

प्रतिनिधि। 31 जुलाई

तिरोडा। आज कुंभारे लॉन, तिरोडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस ची तिरोडा शहर व ग्रामीण सभासद नोंदणी आढावा बैठक माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजीत करण्यात आली.

या सभेला शहर व तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून सभासद नोंदणीचा आढावा घेण्यात आला. सभेला उपस्थितांना संबोधित करतांना श्री राजेंद्र जैन म्हणाले की, खा. प्रफुल पटेल यांचे काम व जिल्ह्याच्या विकासाकरिता असलेली तळमळ आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. कोरोना काळात अनेक लोक घरी बसले होते. पण खासदार प्रफुल पटेल यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्ह्याच्या लोकांना ॲक्सीजन, औषधांचा साठा, इंजेक्शन यामाध्यमातून दिलासा देण्याचा प्रयत्न केला. आता आपली वेळ आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बळकटी देण्यासाठी आगामी नगर परीषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रथम क्रमांकाचा पक्ष बनवण्याचा निर्धार करुया, असे आवाहन उपस्थितांना केले.

यावेळी माजी आमदार राजेंद्र जैन, डॉ.अविनाश जायस्वाल, राजलक्ष्मी तुरकर, प्रेमकुमार रहागडाले, रविकांत बोपचे, योगेंद्र भगत, अजय गौर, कैलाश पटले, मनोज डोंगरे, जगदीश बावनथड़े, किरण पारधी, जितेंद्र चौधरी, विजय बिंजाड़े, राजेश तुरकर, राजू ठाकरे, किरण बंसोड़ अतुल भंडारकार, संदीप मेश्राम, प्रभु असाटी, सलीम ज़वेरी, बाड़ू एरपुढे, नीता रहांगडाले, जया धावडे, रिता पटले, सुनीता मडावी, सविता पटले, चंदाबई शर्मा, ममता बैस, सीमा कटरे, भाग्यश्री केलवडकर, वनमाला डहाके, अनुसया मरस्कोले, ममता हट्टवार, रश्मी बुराडे, दुर्गा रेहकवार, पेलागडेबाई, अलका चौधरी, डॉ.मुकेश पटले, सदानंद पटले, प्रभू असाटी, वासिम शेख, राज अम्बुलें, वासुदेव वैध, राजेंद्र पटले, टेकलाल सोनवाने, दिलीप कावळे, अतुल गजभिये, प्रशांत दहाटे, श्यामराव भोंडेकर, मुन्ना बिंझाडे, टुंडीलाल शरनागत, अल्केस मिश्रा, राहुल गहरवार, मनोहर राऊत, रवि पटले, मोरेस्वर ठाकरे, छोटू बिसेन गुरजी,जगन धुर्वे, रामसागर धावडे, राधेश्याम नागपुरे, विनोद कुकडे, महेश कुकडे, राजू दमाहे, वासुदेव वैद्य,राजेन्द्र चौधरी, सुरेश पटले, धर्मपाल बागडे, खुशाल बोपचे, सहीत बहुसंख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी खा. प्रफुल पटेल यांच्या कुशल नेतृत्वाखाली व माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात तिरोडा शहरातील मुकेशजी बरियेकर, सूरज बरियेकर, सादिकभाई शेख़, महिला प्रमुख कविता ताई तांडेकर यांनी राष्टवादी कांग्रेस पार्टी मध्ये प्रवेश केला. माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते व प्रमूख मान्यवरांच्या उपस्थितीत पक्षाचा दुपट्टा वापरून पक्षात स्वागत करण्यात आला।

Related posts