616 Views
गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची सभासद नोंदणी आढावा बैठक संपन्न
प्रतिनिधि। 28 जुलै
गोंदिया। आज राष्ट्रवादी काँग्रेस भवन, रेलटोली, गोंदिया येथे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची आढावा बैठक माजी आमदार राजेन्द्र जैन, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, नरेश माहेश्वरी, सौ.राजलक्ष्मी तुरकर, रमेश ताराम, रविकांत बोपचे यांच्या प्रमुख उपस्थिति आयोजित करण्यात आली.
या बैठकीला जिल्ह्यातील व सर्व तालुक्यातील प्रमुखांकडून पक्ष सदस्य अभियान अंतर्गत सभासद नोंदणीचा आढावा घेण्यात आला. तसेच सर्व तालुकाध्यक्षांनी ३० जुलै ते ०३ ऑगष्ट पर्यंत सभासद नोंदणीचे पुस्तके, सभासद यादी लवकरात लवकर जमा करण्याच्या दृष्टीने सर्व तालुकानिहाय बैठका लावण्याच्या सूचना जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांनी केल्या.
या बैठकीला मार्गदर्शन करतांना माजी आमदार राजेंद्र जैन म्हणाले की, पक्ष मजबुतीकरिता संघटन सक्षम असणे आवश्यक असते आणी त्यासाठी जास्तीत जास्त सभासद नोंदणी झाली तरच पक्ष मजबुत होईल. जिल्ह्याच्या प्रत्येक गावात, व शहरांच्या वार्डात पक्षाचा सभासद असणे आवश्यक आहे. कारण सामान्य माणसांचे छोटे – छोटे व मूलभूत प्रश्न नगर परीषद, नगर पंचायत व ग्रामपंचायत च्या माध्यमातून सोडवता येतात.
यावेळी सर्वश्री राजेंद्रजी जैन, गंगाधर परशुरामकर, नरेश माहेश्वरी, देवेंद्रनाथ चौबे, राजलक्ष्मी तुरकर, रमेश ताराम, रविकांत बोपचे, तेजराम मडावी, विशाल शेंडे, केवल बघेले, कुंदन कटारे, छोटू पटले, कमलबापू बहेकार, अविनाश काशिवार, रफिक खान, सि के बिसेन,लोकपाल गहाणे, प्रेमकुमार रहांगडाले, अशोक सहारे, यशवंत गणवीर, सुरेश हर्षे, मनोज डोंगरे, डी यू रहांगडाले, सुधा रहांगडाले, जगदीश बावनथडे, मोहन पटले, नीरज उपवंशी, शिवाजी गहाणे, शंकरलाल टेम्भरे, शिवलाल जमरे, नामदेव डोंगरवार, कृष्णकुमार बिसेन, मनोहर वालदे, टीकाराम मेंढे, रमेश चुर्हे, किशोर तरोणे, डॉ अजय उमाठे, कैलास पटले, राजकुमार जैन, गोपाल तिवारी, रवी पटले, अखिलेश सेठ, रामसागर धावडे, हेमंत पंधरे, नानू मुदलियार, राकेश जैस्वाल, सुशील हलमारे, उमराव मांढरे, प्रमोद लांजेवार, नरेश चौहान, प्रवीण रुपारेल, जिम्मी गुप्ता, सैय्यद इकबाल अली, सबिल कुरेशी, खालिद पठाण, छोटू पंचबुद्धे, नेमीचंद ढेकवार, लव्ह माटे, मामा बनसोड, शालिकराम नाकाडे, नागो सरकार, विजेंद्र जैन, पुरण उके, सुनील ब्राह्मणकर, रामचंद्र ठाकरे, मुनेश्वर कापगते, जगदीश पारधी, जया धावडे, रजनी गौतम, शशिकला टेम्भूर्णे, आशा पाटील, सुशीला भालेराव, सुदर्शना वर्मा, अनिता तुरकर, अर्चना चौधरी, पुस्तकाला माने, खुशाल वैद्य, योगेश दर्वे, विनायक शर्मा, रमेश कुरील, विजय रहांगडाले, शैलेश वासनिक, चंद्रकुमार चुटे, महेश करियार, आनंद ठाकूर, सौरभ रोकडे,एकनाथ वाहिले, रुपेश मेंढे, संदीप मेश्राम, राजकुमार ठोके, धनंजय गुप्ता, हरिराम आसवानी, श्रीधर चन्ने, सुरेंद्र नागपुरे, योगेश डोये, सुरेंद्र रहांगडाले, कमलेश बारेवार, फुकचंद पटले, विजय लिल्हारे, बदल भालाधरे, प्रल्हाद महंत, प्रतीक पारधी, रवीकुमार पटले, एस बी राशिद, मदन चिखलोंढे, विजय लिल्हारे, श्याम चौरे, दुर्योधन मेश्राम, प्रतीक मेंढे, बिहारीलाल मस्करे, करण टेकाम, गोविंद लिचडे, माणिक पडवार, आरजू मेश्राम, विकी भाकरे, अभय सहारे, राज शुक्ला, देवा झोडे, हरगोविंद चौरासिया, प्रकाश बरिया, दीपक कनोजे, देलीराम डोहरे, दिलीप डोंगरे, वीरेंद्र ईडपाते, रमेश महंत, इंदल चौहान, रमण उके, संजय असाटी, राजेश रामटेके, सुरेश भिमटे, कान्हा बघेले, रौनक ठाकूर, नरेंद्र बेलगे, कपिल बावनथडे, कुणाल बावनथडे, शरभ मिश्रा, अमितसिंग जतपेले, श्रेयश खोब्रागडे, प्रफुल उके, वामन गेडाम, एन टी बोरकर, गुणवंत मेश्राम, सहित मोठ्या संख्येने पदाधिकरी व कार्यकर्ता उपस्थित होते.
या बैठकीत खासदार प्रफुल पटेल यांच्या निर्देशानुसार व माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांनी सालेकसा तालुका अध्यक्ष पदावर डॉ.अजय उमाटे यांची नियुक्ती करण्यात आली व सालेकसा तालुका पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी व पुढील वाटचाली करीता शुभेच्छा यावेळी देण्यात आल्यात.