पॉलीटेक्नीक प्रवेशाला विध्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, जिल्ह्यात आतापर्यंत १३०० विध्यार्थ्यांची नोंदणी

497 Views

पॉलीटेक्नीक प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया समजून घ्या-प्रा. स्वप्नील अंबादे

 

गोंदिया :  जिल्ह्यात शासकीय तंत्रनिकेतनगोंदिया मध्ये ३६० विद्यार्थ्यांची व इतर खाजगी तंत्रनिकेतन मध्ये ६०० विद्यार्थ्यांची असे एकूण ९६० विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या १० वी चा निकाल जाहीर झाल्यानंतर आतापर्यंत सुमारे १३०० विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहेतर ८०० विद्यार्थ्यांनी प्रवेश शुल्क भरून आपला अर्ज कन्फर्म केला आहेअशी माहिती जिल्ह्यातीत नोडल अधिकारी व प्राचार्य डॉ. सी.डी.गोळघाटे यांनी दिली.

          सी.बी.एस.सी. बोर्डाचा १० वी चा निकाल जाहीर होणे बाकी आहे. सी.बी.एस.सी. बोर्डाचा १० वी चा निकाल जाहीर झाल्यास नोंदणी संख्येत आणखी भर होण्याची शक्यता आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने पदविका प्रवेशाकरिता यंदा स्कूल कनेक्ट‘ हा उपक्रम राबविला. या उपक्रमअंतर्गत शासकीय तंत्रनिकेतनगोंदिया तर्फे जिल्ह्यात २३४ शाळांना जोडण्याचा कार्य केले गेले व १२ हजार  विद्यार्थ्यांपर्यंत तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाचे महत्व आणि संस्थेची माहिती पोहोचवली आहेअसे प्रवेश प्रक्रिया प्रभारी अधिकारी डॉ. प्रशांत शर्मा यांनी सांगितले.

     • प्रवेश प्रक्रिया बद्दल माहिती–  प्रा. स्वप्नील अंबादेसमन्वयकप्रथम वर्ष सुविधा केंद्र यांनी माहिती दिली आहे.
पॉलीटेक्नीक प्रवेश प्रक्रिया ही एकदम सोपी असून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. विद्यार्थी घरी बसून कुठेही न जाता स्मार्ट फोनच्या माध्यमातून या प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. प्रथम वर्ष पॉलीटेक्नीक प्रवेश करिता सर्वप्रथम https://poly22users.dte.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर भेट देऊन नोंदणी करायची आहे.


नोंदणी करतांना कागदपत्राची पडताळणी व अर्ज भरल्याची निश्चिती करण्याकरिता ई-स्क्रूटनी (E-Scrutiny)  किंवा प्रत्यक्ष- स्क्रूटनी (Physical-Scrutiny) पैकी कुठलाही एक पर्याय निवडायचा आहे. ई-स्क्रूटनी मोड मध्ये सर्व प्रक्रिया ऑनलाईन राहणारकागदपत्राची पडताळणी करिता शासकीय तंत्रनिकेतनगोंदिया येथे येण्याची गरज नाही. प्रत्यक्ष- स्क्रूटनी मोड मध्ये कागदपत्राची पडताळणी करिता मूळ कागदपत्रासह शासकीय तंत्रनिकेतनगोंदिया येथे यावे लागणार. या प्रक्रीयेकरिता सध्या १४ जुलै २०२२ ही शेवटची तारीख आहे. ज्या विद्यार्थ्यांनी १० वी महाराष्ट्र बोर्डातून उत्तीर्ण केली आहे त्यांनी नोंदणी करतांना १० वी परीक्षेचा आसन क्रमांक टाकल्यास त्याचे गुण सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपोआप फार्ममध्ये येतात. अशा विद्यार्थ्यांना १० वी ची गुणपत्रिका नलाईन अपलोड करण्याची आवश्यकता नाही.

ज्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचे प्रमाणपत्रजात प्रमाणपत्रनॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र अध्याप अप्राप्त आहे असे विद्यार्थी सुद्धा नोंदणी करून अर्जाचे शुल्क भरून अर्ज भरल्याची निश्चिती करू शकतात. शाळा सोडल्याचे प्रमाणपत्रजात प्रमाणपत्रनॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र १८ जुलै २०२२ पर्यंत उपलब्ध झाल्यास नलाईन अपलोड करू शकतात. अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगीनच्या माध्यमातून ग्रीव्हीअन्स रिक्वेस्ट पाठवावी लागेल. शासकिय तंत्रनिकेतनच्या वतीने त्यांचा फार्म अनलॉक करण्यात येईल मग सदर विद्यार्थी त्यांचे कागदपत्र नलाईन अपलोड करू शकणार.
तात्पुरती गुणवत्ता यादी १६ जुलै २०२२ ला ऑनलाईन प्रदर्शित करण्यात येईल.
गुणवत्ता यादीमध्ये काही दुरुस्ती असल्यास (नावगुणजात व इतर) १६ जुलै ते १८ जुलै २०२२ च्या दरम्यान करण्यात येईल.

अंतिम गुणवत्ता यादी दि. १९ जुलै २०२२ ला नलाईन प्रदर्शित करण्यात येईल. अंतिम गुणवत्ता यादी प्रदर्शित झाल्यानंतर कुठलाही फेरबदल करता येणार नाही. विद्यार्थ्यांनी तात्पुरत्या गुणवत्ता यादीमधे स्वतः ची माहिती नीट तपासून घ्यावी व काही दुरुस्ती आल्यास संपर्क साधावा, असे आवाहन प्रा. स्वप्नील अंबादेसमन्वयकप्रथम वर्ष सुविधा केंद्र यांनी केले आहे.

अंतिम गुणवत्ता यादी नलाईन प्रदर्शित झाल्यानंतर कुठल्या तंत्रनिकेतन मध्ये कुठली शाखा निवडायची  म्हणजे ऑप्शन फॉर्म भरणे व तंत्रनिकेतन मिळाल्यावर प्रवेश घेण्याकरिता कोणत्या तारखेला संस्थेत मूळ कागदपत्रासह जायचे आहे याचे वेगळे वेळापत्रक https://poly22users.dte.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.

अद्ययावत वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध आहे, विद्यार्थ्यांनी वेळोवेळी संकेतस्थळावर भेट देऊन वेळापत्रक पाहावे. अधिक माहितीसाठी प्रा. भूपेंद्र देशमुख (९३७०४३८६३३)अधिव्याखाता अणुविद्युत व दूरसंचार अभियांत्रिकी शासकीय तंत्रनिकेतनगोंदिया यांचाशी संपर्क साधावा.

Related posts