गोंदिया: शेतक-यांकडून धान न घेता व्यापारांचे धान खरेदी, एका तासामध्ये ४.५० लक्ष क्विंटल धान खरेदी..

383 Views

 

आ.विनोद अग्रवाल यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांच्याकड़े केली तक्रार..

प्रतिनिधी/गोंदिया

गोंदिया जिल्ह्यामध्ये राज्यात नवीन सरकाराचे गठन झाल्यानंतरच विदर्भातील ६ आमदाराद्वारे रब्बी धानाकरीता धान खरेदी केंद्र सुरु करणेबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले होते त्यानंतर काही दिवसातच रब्बी धान खरेदीकरीता आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले.त्यात दि.०७/०७/२०२२ रोजी झालेल्या धान खरेदी मध्ये शेतक-यांकडून धान न घेता व्यापारांचे धान खरेदी करण्यात आलेली आहे.तसेच एका तासामध्येच ४.५० लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे.शेतक-यांकड़े असलेले धान खरेदी न केल्याने ही बाब शेतक-यांवर अन्यायजनक आहे. पावसाळाच्या दिवसांची सुरुवात झाली आहे तसेच अनेक शेतक-यांनी धान पीकाची लागवड सुरु केली आहे. आधारभुत शासकीय धान खरेदी मध्ये शेतक-यांचे धान खरेदी न केल्याने त्यांना आर्थिक अडचणी चा सामना करावे लागत आहे. जर आधारभूत धान खरेदीत शेतकऱ्यांचे धान खरेदी केले असते तर त्यांना आर्थिक संकटाचा समोर जावे लागले नसते. तसेच एका दिवसात जेवढे धान खरेदी करता येते त्यापेक्षा जास्त धानाची खरेदी एका दिवसात झाली आहे, ही बाबही विचारात घेण्यासारखी आहे.

आ.विनोद अग्रवालांनी या साठी शेतक-यांना न्याय देण्यासाठी ज्या आधारभूत धान खरेदी मध्ये शेतक-यांकडून धान न घेता व्यापारांचे धान खरेदी केले आहे त्यांची योग्य चौकशी करून योग्य कार्यवाही करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांना धान खरेदी केंद्रावर तसेच संबधित अधिका-यांवर कार्यवाही करण्यात यांवी अशी मागणी केली आहे.

Related posts