गोरेगाँव: मुंडीपार येथे दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…

337 Views

 

गोरेगांव:- तालुक्यातील ग्राम मुंडीपार येथील लोकमान्य टिळक विद्यालय मुंडीपार येथे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या वर्ग दहावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला यात लोकमान्य टिळक विद्यालय मुंडीपारचा निकाल 98 टक्के लागला. येथील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार 28 जून रोजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. लक्ष्मण भगत यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला.

यावेळी विशेष अतिथी पंचायत समिती सदस्या सौ. शितलताई बिसेन, ग्राम मुंडीपारचे सरपंच सुमेंद्र धमगाये, उपसरपंच जावेद (राजा) खान, सेवानिवृत्त मुख्याध्यापक बी.जी कटरे सर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक एच.एस.बिसेन सर,ग्रामसेवक अरविंद साखरे, तंमुस अध्यक्ष गिरीश पारधी, माजी तंमुस अध्यक्ष नामदेव नेवारे,माजी तंमुस अध्यक्ष घनश्याम बिसेन, शामाप्रसाद मुखर्जी समिती अध्यक्ष टुकेंद्र भगत, वन व्यवस्थापन समिती अध्यक्ष फागेंद्र बिसेन, ग्रामरोजगार सेवक उमेंद्र ठाकुर, ज्ञानेश्वर राऊत, राजेंद्र बिसेन, सोनु शेंडे, रोहित पांडे, सुनिल वाघाडे, अजय नेवारे आदी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

इयत्ता दहावी मध्ये प्रथम क्रमांक तृप्ती अरुण वैद्य 92 टक्के,व्दितीय क्रमांक चेतना होमराज रहांगडाले 91.80 टक्के व पूजा चोपलाल बिसेन 91.80 टक्के,तृतीय क्रमांक रमाई किशोर धमगाये 91.60 टक्के व लविना पुरणलाल ठाकुर 91.60 टक्के, प्राची रमेश शहरे 89 टक्के, राजीव जनीराम आंबेडारे 88.20 टक्के,अश्विनी तुळशीराम सौंदरकर 88 टक्के, सिमरन रमेश धमगाये 87.80 टक्के, रिया ओमप्रकाश रहांगडाले 87 टक्के, निशांत यशवंतराव चाचेरे 86.80 टक्के, डॉली योगराज चौरागडे 86.80 टक्के गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सत्कार करण्यात आला.

यावेळी प्राचार्य एस.एस.बिसेन सर,एस.आर.नेवारे सर,ए.जी.राठोड सर,एन.डी.नंदेश्वर सर,यु.जे.मानापुरे सर,सौ.एस.व्ही.पटले मॅडम व सर्व शिक्षक- शिक्षकेत्तर,कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन होमेश्वर ठाकुर सर यांनी केले तर सौ.आय.बी.गिरेपुंजे मॅडम यांनी आभार मानले.

Related posts