प्रतिनिधि। 24 जून
गोंदिया। गोंदिया शहराला प्लास्टिकमुक्त करून सुंदर आणि निरोगी बनविण्याचा ध्यास घेऊन पूर्णा पटेल यांच्या नेतृत्वात मुंबई येथील एकसाथ फाऊंडेशन माध्यमातून शहरात सुरु झालेली स्वच्छता मोहीम आज रामनगर परिसरात राबविण्यात आली. संपूर्ण रामनगर परिसरातील प्लास्टिक गोळा करण्यासोबतच नागरिकांशी संवाद साधत परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
रामनगर पोलीस ठाणे परिसरातून सुरु करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेच्या वेळी गोंदिया शिक्षण संस्थाचे संचालक निखिल जैन, गोंदिया नगर परिषदेचे मुख्याधिकारी करण चव्हाण, एकसाथ फाऊंडेशन मुंबईचे दीपिका मिश्रा, संपूर्ण अर्थ चे देवर्था बॅनर्जी, गोंदिया शिक्षण संस्था संचालित महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक, संस्कृती महिला मंडळाच्या सदस्य, गुजराती शाळेतील शिक्षक कर्मचारी, नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.
पूर्णा पटेल यांच्या नेतृत्वात गोंदिया शहराला प्लास्टिक आणि कचरा मुक्त करण्याचा ध्यास घेऊन मुंबई येथील एकसाथ फाऊंडेशन च्या माध्यमातून ३ जून २०२२ रोजी गोंदिया शहरात स्वच्छता मोहीम सुरु करण्यात आली. सुरुवात मोक्षधाम आणि डम्पिंग यार्ड परिसरातून करण्यात आली. नंतर शहरातील बाजार परिसर व मुख्य रस्त्यावर स्वच्छता मोहीम राबवून नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.
आज, 24 जून रोजी ही स्वच्छता मोहीम रामनगर परिसरात राबविण्यात आली. रामनगर बाजार चौक, रामनगर नगर परिषद शाळा, मनोहर कॉलोनी, धोटे प्रेस ते नटवरलाल माणिकलाल दलाल महाविधालयापर्यंतचा संपूर्ण रामनगर परिसरातील प्लास्टिक गोळा करण्यात आले.
पुन्हा उपयोगात येणारे प्लास्टिक आणि उपयोगात न येणारे प्लास्टिक असे दोन प्रकारे प्लास्टिक गोळा करण्यात आले. या पूर्वी गोळा करण्यात आलेले प्लास्टिक येथून थेट चंद्रपूर येथील सिमेंट कारखान्यात वापरासाठी पाठविण्यात आले. या पुढेही गोळा करण्यात येणारे प्लास्टिक वापरात येणारे व वापरात न येणारे असे वेगळे करून चंद्रपूर येथील कारखान्यात पाठविण्यात येतील, असे या प्रसंगी पूर्णा पटेल व निखिल जैन यांनी सांगितले.
आपले आरोग्य आपली जबाबदारी असून प्रत्येकाने स्वच्छता पाळल्यास आपला परिसर स्वच्छ राहील. प्रत्यकाने स्वतःची जबाबदारी म्हणून स्वच्छता पाळून परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन पूर्णा पटेल व निखिल जैन यांनी केले.
यावेळी प्राचार्य जिवानी, प्राचार्य निकोसे, प्रा. एजाज शेख, प्रा. भावेश जसानी, प्रा. परवीन कुमार, प्रा. बबन मेश्राम, प्रा. उर्विल पटेल, प्रा. योगेश बैस, प्रा. कदंबे, प्रा. पाटील, प्रा. तृप्ती पटेल, प्रा. कविता पटेल, प्राचार्या रिझवाना, रेणुका जडेजा, प्रा. नीलकंठ भेंडारकर, प्रा. प्रेम बसेने, प्रा. रवी रहांगडाले, शिवम अग्रवाल, रचित पटेल, आनंद मकवाना, वाजेद अली सय्यद, अमोल बेलगे, घनशाम गेडेकर, निधी शर्मा, दुर्गा येडे, गीता खिरेकर, मनोज पटले, नरेंद्र बेलगे यांच्यासह नटवरलाल माणिकलाल दलाल महाविधालयाचे एनसीसी व एनएसएस चे स्वयंसेवक, संस्कृती महिला मंडळाचे सदस्य, गुजराती शाळेचे शिक्षक कर्मचारी, नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.