गोंदिया: रविवारी रजेगाव येथे राजश्री शाहू महाराज जयंती महोत्सव, सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधी तज्ञ सीमा कुशवाह यांची उपस्थिती..

240 Views

 

गोंदिया-( ता. 24) तालुक्यातील रजेगाव (लहान)येथे रविवारी (ता. 26) छत्रपती राजश्री शाहू महाराज सार्वजनिक सामाजिक जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला दिल्ली येथे घडलेल्या निर्भया प्रकरणातील प्रमुख वकील तथा सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधी तज्ञ सीमा समृद्धी कुशवाह प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

दुपारी बारा वाजता आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी नयना गुंडे, सहाय्यक आयकर आयुक्त धनंजय वंजारी, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वा पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ताजने, जि.प. उपशिक्षणाधिकारी डॉ.महेंद्र गजभिये, ग्रामीण रुग्णालय रजेगाव येथील वैद्यकीय अधीक्षक सुप्रिया बोरकर, ऍड. स्वयं, आदिवासी समाज संघटनेचे जिल्हा सचिव अनिल वट्टी, मरार समाज कल्याण समितीचे जिल्हाध्यक्ष विनायक खैरे, डॉ. राजेंद्र वैद्य, डॉ. प्रशांत मेश्राम, डॉ. अनिल आटे, डॉ. सनम देशभ्रतार, शिक्षक भारती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रकाश ब्राह्मणकर, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, सहयोग ग्रुपचे संचालक जयचंद रमादे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त मंगेश वानखेडे, सहाय्यक धर्मादाय आयुक्त विशाल शेंडे, कनिष्ठ भुवैज्ञानिक तरुण पाटील, जिल्हा उपनिबंधक शुद्धोधन कांबळे, जिल्हा सांख्यिकी अधिकारी रूपेश राऊत, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख रोहिणी सागरे,कार्यकारी अभियंता एन.टी. लभाने, पो.नि.अनिल पाटील, सहा.पो.नि. तेजेंद्र मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते विलास वासनिक, ज्योतीप्रकाश गजभिये, एड. सचिन बोरकर, आनंद बोरकर, संतोष डोंगरे, जोगेंद्र गजभिये, नरेंद्र मेश्राम, सविता बेदरकर, वाहतूक उपनिरीक्षक महेश पवार, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी राजू माटे, प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. दरम्यान कार्यक्रमात संगीतमय प्रभोधनाचे शुद्धा आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमाला परिसरातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान शाहु महाराज जयंती महोत्सव समितीने व रजेगाव येथील गावकऱ्यांनी केले आहे.

Related posts