गोंदिया: शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला..,गोरेगाँव तालुक्यातील गहेलाटोला शेतशिवारात घटली घटना

461 Views

 

प्रतिनिधि। 23 जून

गोंदिया। गोरेगाव तालुक्यातील गहेलाटोला येथील एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला चढविल्याचे आज दिनांक २३ जून २०२२ रोजी साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान उघडकीस आले आहे. सदर शेतकरी हा आपल्या शेतशिवारात धानाची पेरणी करण्याकरता गेला असता त्याच्यावर वाघाने हल्ला चढविला. राजेश कांबळे वय ३२ वर्षे असे शेतकऱ्याचे नाव आहे.

गावचे सरपंच व उपसरपंच संदीप मेश्राम यांनी मासिक मीटिंग सोडून लगेच घटनास्थळाकडे धाव घेतली. गोरेगाव वन विभागाचे अधिकारी सुरेश रांहांगडाले यांनी घटनास्थळ गाठले असून जखमींला ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गहेलाटोला परिसरात वाघाने हल्ला केल्याने मुंडीपार भंडगा, कमरगाव, घोटी, जानाटोला, गहेलाटोला या परिसरात वाघाची दहशत कायम झाली आहे.

वाघाच्या हल्ल्याची ही पहिलीच घटना नसून या अगोदरही या परिसरात वाघाने हल्ला केल्याने भंडगा येथील एका शेतकऱ्याला आपले जीव गमवावे लागले होते. पावसाळ्याच्या दिवसात शेतीचे कामे असतात शेतशिवारात शेतकरी शेतीकामे करण्याकरिता जात असतात परंतु दिवसेंदिवस होत असलेल्या वाघांच्या हल्ल्याने परिसरात दहशतीचे वातावरण कायम झाले आहे.

Related posts