वर्षाबेन प्रफुल्ल पटेल यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेशी भेट, साकोली व लाखनी उड्डाणपूल सुरु करण्यासंबंधी चर्चा

370 Views

 

प्रतिनिधि।

भंडारा: मनोहरभाई पटेल अ‍ॅॅकॅडमीच्या अध्यक्षा सौ. वर्षाताई प्रफुल्ल पटेल हे दि.२८ एप्रिल २०२२ रोजी दिल्लीवरुन नागपूर विमानतळावर आले असता तेथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट झाली. या भेटीदरम्यान सौ. वर्षाताई पटेल यांनी साकोली व लाखनी येथील उड्डाणपूल लवकरात लवकर सुरु करण्यासंबंधी चर्चा करण्यात आली. यासोबतच सुविधा संबंधी सुध्दा चर्चा करण्यात आली. ना.नितीन गडकरी यांनी साकोली व लाखनी उड्डाणपूलावर नागरिकांकरीता सुविधा उपलब्ध करुन लवकरात लवकर वाहतुकीकरीता सुरु करण्यात येईल असे आश्वासन वर्षाताई पटेल यांना देण्यात आले. वर्षाताई पटेल यांनी ना.नितीन गडकरी यांचे आभार मानले.

मागील दोन-अडीच वर्षांपासून साकोली व लाखनी येथे महामार्गावर उड्डाणपूलाचे काम सुरु असून दोन्ही उड्डाणपूलाचे काम पूर्णत्वास आले आहे. पुलावरुन वाहतूक बंद असल्याने दोन्ही शहरांमध्ये वाहतुकीची मोठी समस्या आहेत. अनेकदा वाहतूक विस्कळीत होऊन वाहन धारकांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पूर्णत्वास आलेल्या साकोली व लाखनी उड्डाणपुलावरुन वाहतूक लवकरात लवकर सुरु करावी, अशी मागणी करण्यात आली होती.

वर्षाताई पटेल यांनी नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने दोन्ही पुलांवर सोयीसुविधा उपलब्ध करुन वाहतुकीसाठी सुरु करण्यात यावे या संबंधी ना.नितीन गडकरी यांचेशी चर्चा केली. ना.नितीन गडकरी यांनी सुध्दा लवकरात लवकर सुविधा उपलब्ध करुन वाहतुकीकरीता पूल सुरु करण्यात येईल, असे चर्चेअंती आश्वासन दिले. सौ. वर्षाताई पटेल यांनी ना.नितीन गडकरी यांचे आभार मानले.

Related posts