एटीएम कार्डची अदलाबदल कस्न फसवणूक करणाऱ्या आरोपीला पकडण्यात अर्जुनी-मोर पोलिसांना यश..

224 Views

प्रतिनिधि. 23 एप्रिल
गोंदिया। दिनांक 07/04/2022 रोजी अर्जुनी-मोर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरमध्ये
एका अनोळखी इसमाने फिर्यादी पितांबर जीवन लाडे रा. अर्जुनी मोरगाव यांना एटीएम मधून पैसे काढून देण्यास मदत केली. फिर्यादी घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांच्या लक्षात आले की त्यांच्या अकाउंट मधून 37 हजार रुपये कमी झाल्याचा मेसेज आला आहे. त्यांच्याजवळ असलेले एटीएम कार्ड पाहिले असता ते एटीएम कार्ड त्यांचे नव्हते तर दुसऱ्या कुणाचे तरी होते. त्यामुळे फिर्यादीच्या लक्षात आले की काल एटीएम सेंटरमध्ये ज्या अनोळखी इसमाने आपल्याला मदत केली त्यानेच एटीएम कार्डची अदलाबदल करून आपल्या अकाउंट मधून पैसे काढून आपली फसवणूक केलेली आहे.

फिर्यादी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यासाठी आल्यानंतर पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांनी तात्काळ 105/2022 IPC 420 प्रमाणे गुन्हा दाखल केला.

अर्जुनी-मोर पोलिसांनी भौतिक पुरावे, तांत्रिक तपास व गोपनीय बातमीदारांकडून माहिती काढून आरोपी सत्यपाल नामदेव नाकतोडे रा. वडसा याला अटक केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.

या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक गोंदिया विश्व पानसरे, उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी संकेत देवळेकर व पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी तागड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम तसेच पोलीस हवालदार प्रवीण बेहरे, रमेश सेलोकर, श्रीकांत मेश्राम, मोहन कुईकर, गौरीशंकर कोरे यांनी केलेली आहे.

Related posts