स/अर्जुनी: खोडशिवणी येथे वीज वितरण कंपनीचे 33 केव्ही सब स्टेशन मंजूर…

195 Views

 

खा. प्रफुल्ल पटेल, पालकमंत्री प्राजक्त तनपुरे, माजी आमदार राजेंद्र जैन व आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे गंगाधर परशुरामकर यांनी मानले आभार

प्रतिनिधि। 23 अप्रैल

सडक अर्जुनी: तालुक्यातील ग्राम खोडशिवणी व परिसरातील गावे डव्वा सब स्टेशनला जोडली आहेत. त्यामुळे डव्वा सब स्टेशन वर खूप जास्त अधिभार येत असतो. यामुळे घरगुती व कृषी विज ग्राहकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे डव्वा व खोडशिवनी परिसरात विजेची समस्या खूप असते याची राष्ट्रवादी काँगेस चे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांनी या समस्येची दखल घेवून त्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यां सोबत चर्चा केली तेव्हा त्यांनी खोडशिवनी नवीन सब स्टेशन केले शिवाय यातून सुटका होणार नाही हे निदर्शनास आणून दिले तेव्हा ही गोष्ट खासदार प्रफुल्ल पटेल व मनोहर चंद्रिकापुरे यांचे समोर ही समस्या गंगाधर परशुरामकर यांनी मांडली. श्री पटेल यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यां सोबत चर्चा करून खोडशिवनी सब स्टेशन चा प्रस्ताव सादर करण्यात यावा अशा सूचना दिल्या व तसे सबंधित विभागाला पत्र दिले एवढेच नाही तर जेव्हा जेव्हा वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यां सोबत चर्चा झाली तेव्हा तेव्हा खोडशिवनी सब स्टेशन चा प्रश्न चर्चेत आला. नुकतेच जिल्ह्याचे पालकमंत्री प्राजक्त तनपुरे गोंदिया जिल्हय़ाचे दौरा वर असताना हा सदर विषय गंगाधर परशुरामकर यांनी त्यांचे समोर ही विजेची समस्या मांडली आणि त्याचा परीणाम असा झाला की खोडशिवनी सब स्टेशनला 18 एप्रिल 2022 ला मंजुरी प्रदान करण्यात आली. त्यामुळे या परिसरात आनंदाचे वातावरण पसरले असून या परिसरातील डव्वा व खोडशिवणी येथील विजेचे प्रश्न दूर होतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

खोडशिवणी व परिसरातील जनतेने खासदार प्रफुल पटेल, पालकमंत्री प्राजक्त तनपुरे, माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे व गंगाधर परशुरामकर यांचे आभार मानले.

Related posts