पेन ड्राईव च्या माध्यमातुन रेती चोरीचे प्रकरण सभागृहामध्ये गाजले, आ. डॉ परिणय फुके यांनी सादर केली रेती चोरीची व्हिडीओ रेकॉर्डिंग..

274 Views

 

प्रतिनिधि।

भंडारा : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या ट्रॅपच्या वेळी पळून गेलेल्या वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यावर आता निश्चिचतपणे कारवाई होणार, असे बोलले जात आहे. कारण भंडारा-गोंदियाचे विधानपरिषद सदस्य आमदार डॉ. परिणय फुके यांनी वाळू माफिया आणि महसूल अधिकाऱ्यांचे संगनमत सिद्ध करणारी रेकॉर्डिंग व प्रत्येक घाटावर कश्या प्रकारे रेती चोरी होत आहे याची व्हिडिओ रेकॉर्डिंगच सभागृहात सादर केली.
यावेळी आमदार डॉ. परिणय फुके म्हणाले, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यात होणाऱ्या वाळू तस्करीचे विषय मी सभागृहात मांडले. यावर वाळू तस्करी होतच नाही, असे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणत आहेत. त्यामुळे मग मी पुरावा म्हणून ऑडिओ आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग असलेला पेन ड्राईव्ह सभागृहात सादर केला. वाळू तस्करीत महसूल खात्याच्या मंत्र्यांपासून ते खालपर्यंतचे कर्मचारी गुंतलेले आहेत. म्हणून कारवाई होत नाही. सर्व पुरावे असताना दोषी अधिकाऱ्यांवर सभागृह कारवाई करू शकत नसेल, तर आता दुसरा मार्ग अवलंबावा लागेल.
महसूल विभागाला कायद्यात बदल करण्याची गरज असल्याचे सभापतींनी सांगितले. जीपीएस प्रणालीद्वारे या अवैध वाळू चोरीच्या गुन्ह्यांवर लक्ष ठेवता येऊ शकते का, याबाबत शंका आहे. मात्र जर असे घडत असेल तर कडक पाऊल म्हणून सरकारने मोक्का लावावा, अशी सूचना सभापतींनी केली. यावर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी याबाबत विचार करू, येवढेच मोघम उत्तर दिले आहे. दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाल्याशिवाय वाळू चोरीला आळा बसणार नाही. त्यामुळे सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे तरी कारवाई करावी, अशी मागणी आमदार डॉ. फुके यांनी केली आहे. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील त्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर कारवाई निश्चिॉत केली जाईल, असे बोलले जात आहे.

महसूल अधिकाऱ्यांचे वाळू माफियांसोबत असलेले साटेलोटे आता त्यांच्यावर उलटायला सुरुवात झाली आहे. आरोप असलेल्या संबंधित अधिकाऱ्याने वाळू तस्करी करणाऱ्या 6 गाड्या पकडल्या. मात्र त्यावर कोणतीही कारवाई न करता सोडून दिल्या होत्या. या घटनेची नोंद असल्याचे पुरावे आमदार फुके यांनी दिले सादर केले आहेत. मोठी आर्थिक उलाढाल झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सभागृहाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत आणि त्या अधिकाऱ्याला निलंबित करणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यामुळे वाळू तस्करीत हात ओले करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. वाळू माफियांशी असलेले संबंध महसूल अधिकाऱ्यांना संकटात टाकणारे ठरत आहेत. भंडारा जिल्ह्यात झालेले एसीबी ट्रॅप व अनेक महसूल अधिकाऱ्यांवर झालेल्या कारवाईतून वेळोवेळी समोर आले आहे. तरी देखील महसूल अधिकाऱ्यांनी त्यातून धडा घेतलेला नाही. या पुढे सुध्दा शासनाकडून कोणतेही ठोस पावले उचलल्या गेली नाही तर आपण वेळ प्रसंगी केंद्र शासनाकडे या संपुर्ण प्रकारणाची सी.बी.आय. चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे डॉ फुके यांनी सांगितले.

Related posts