गोंदिया: भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास च्या तालुकाध्यक्षपदी देवेंद्र रामटेके यांची निवड

280 Views

 

गोंदिया-(ता. 2)भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास च्या गोंदिया तालुका अध्यक्षपदी पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र रामटेके यांची निवड करण्यात आलीआहे.
भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास ची निर्मिती प्रसिद्ध समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली असून या न्यासचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्राभर आहे.

वरील नियुक्ती जन आंदोलन न्यास चे विश्वस्त डॉ. विश्वनाथ कुंभारे, उपाध्यक्ष अशोक सब्बन यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष माधवराव तरोणे यांनी केली आहे.

देवेंद्र रामटेके यांची न्यास च्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तिरोडा तालुका अध्यक्ष सुनील बारापात्रे ,सडक अर्जुनी तालुकाध्यक्ष गोवर्धन खोबरागडे, सालेकसा तालुका अध्यक्ष यशवंत शेंडे,पत्रकार महेंद्र गजभिये, प्रीतम मेश्राम, सामाजिक कार्यकर्ते सुधीर चंद्रिकापुरे, हसन कोटांगले,राजू सतदेवे, चैनलाल दमाहे, संदीप कावळे, नानाजी वाहाने, विजय मेश्राम, चंद्रमणी खोबरागडे, गजेंद्र वंजारी, उत्तम बोंबर्डे, शिवलाल नेवारे, संदीप बानेवार,दुर्योधन वंजारी,मुकेश बनसोड, जिल्हा परिषद सदस्य दीपाताई चंद्रिकापुरे, यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Related posts