गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी डॉक्टर सेलची आढावा बैठक संपन्न

190 Views

 

गोंदिया। गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी डॉक्टर सेलची आढावा बैठक राष्ट्रवादी काँग्रेस भवन गोंदिया येथे खासदार मा.श्री प्रफुल्ल जी पटेल, श्री राजेंद्र जी जैन, माजी आमदार यांच्या मार्गदर्शनानुसार व मा. डॉ.नरेन्द्रजी काळे, प्रदेश अध्यक्ष डॉक्टर सेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (महाराष्ट्र) मार्गदर्शक व जिल्हा अध्यक्ष मा. गंगाधरजी परशुरामकर यांच्या अध्यक्षतेखाली व गोंदिया जिल्हा अध्यक्ष डॉ. अविनाश जैस्वाल यांच्या उपस्थितीत पार पडली.

डॉ.नरेन्द्रजी काळे यांनी संबोधित करतांना म्हणाले की, डॉक्टर सेल ची संघटना मजबूत करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्या सोबतच आरोग्य क्षेत्रात लोकोपयोगी उपक्रम राबविण्याच्या सुचना दिल्या. कोव्हीड काळात राज्यातील महाविकास आघाडी सरकार ने केलेल्या कामाची माहिती दिली.डॉक्टरांच्या समस्या बद्दल प्रश्न मांडले. डॉ.अविनाश जैस्वाल यांनी सांगितले की, जिल्ह्यात मनोहरभाई पटेल अकँडमी च्या सहकार्याने मेडिकल कॅम्प व रुग्ण सेवा, अपंगा करिता मेडिकल इक्यूपमेन्ट देण्याचे कार्य जाते. डॉ चंदन रंगारी यांनी CHO संबंधित समस्या मांडण्यात आले, डॉ मोहित गौतम, डॉ प्रदिप रोकडे व डॉअजय ऊमाटे यांनी होमिओपॅथिक डॉक्टरांच्या संबंधी समस्या शासन दरबारी मार्गी लावावी अशी विनंती केली व निवेदन दिले।

या प्रसंगी यावेळी मा. नरेश माहेश्वरी, राष्ट्रवादी डॉक्टर सेल चे सरचिटणीस डॉ विनोद जाधव , डॉ. योगेंद्र भगत, राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या जिल्हा अध्यक्ष सौ. राजलक्ष्मी तुरकर, गोदीया जिल्हा राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे कार्याध्यक्ष डॉ. मोहित गौतम व डॉ उल्हास गाडेगोणे, डॉ. राजेंद्र टेंभरे डॉ. हेमंत गौतम हे निमा च्या वतीने प्रमुख अतिथी होते.

तसेच डॉ. राजेंद्र वैद्य, डॉ शशांक डोये. डॉ. संदीप मेश्राम, डॉ. प्रदीप रोकडे, डॉ. अनिल पारधी, डॉ रजनीश (टेकचंद) रहांगडाले ,डॉ दिपक रहीले, डॉ. थानेन्द कटरे. डॉ. कैलास हेमने डॉ. अजय उमाटे, डॉ. संदीप पटले, डॉ तरुण मंडल, CHO संघटना चे डॉ चंदन रंगारीडॉ.सुभाष चौधरी, प्रभाकर दोनोडे , सुरेश हर्षे, राजेश तुरकर,सचीन ढबाले, डॉ जागेश हिरापुरे, डॉ त्रीलोक गुरलवार, डॉ अभ्युदय चौधरी, अशोक लांजेवार, राकेश जायसवाल सह अनेक डॉक्टर, पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ अविनाश जयस्वाल यांनी केले व आभार डॉ मोहित गौतम यांनी केले.

Related posts