खा. श्री प्रफुल पटेल यांच्या हस्ते नवनिर्वाचित जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपंचायत सदस्यांचा सत्कार

244 Views

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सभासद नोंदणीचा शुभारंभ..

भंडारा। राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय, भंडारा येथे खासदार मा.श्री प्रफुल पटेल जी यांच्या प्रमुख उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी पक्ष सभासद नोंदणी चा शुभारंभ करण्यात आला तसेच भंडारा व साकोली विधानसभा क्षेत्रातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती व नगरपंचायत च्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार खासदार श्री प्रफुल पटेल जी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी श्री पटेल संबोधित करताना म्हणाले की, आगामी नगरपरिषदेच्या निवडणूका पक्ष मजबुतीने लढणार असुन कार्यकर्त्यांनी एकजुटीने कार्य करावे.

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांतील तालुक्यातील निकाल धक्कादायक आले. येणार्‍या निवडणुकीत झालेल्या चुका पुन्हा न करता चुकांपासुन बोध घेत भविष्यात यश कशाप्रकारे मिळेल या करीता कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. पक्ष सभासदांची जास्तीत जास्तं नोंदणी करुन पक्ष वाढी करीता आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत असे आवाहन श्री पटेल यांनी केले.

कार्यक्रम प्रसंगी मा. खा. श्री. प्रफुल पटेल जी यांच्या सोबत सर्वश्री राजेंन्द्रजी जैन, नाना पंचबुद्वे, आमदार राजु कारेमोरे, मधुकर कुकडे, धनंजय दलाल, डाॅ. जगदीश निबांर्ते, अविनाश ब्राम्हणकर, डाॅ. रविन्द्र वानखेडे, सौ. सरीता मदनकर, यशवंत सोनकुसरे, राजपूत सर, अॅड. विनयमोहन पशीने, बाबुरावजी बागडे, महेंन्द्र गडकरी, जुमाला बोरकर, उमेश ठाकरे, अमर उजवणे, प्रदिप सुखदेवे, सुनील साखरकर, राजु हाजी सलाम, राहुल निर्वाण, ऍड.नेहा शेंडे, शुभांगी खोब्रागडे, मनोज पोहरकर, त्रिवेनि पोहरकर, धन्नू व्यास, सचिन भैसारे, निशा मोहनकर, कांताबाई निर्वाण, विभा हजारे, प्रेरणा व्यास, नरेंद्र झंझाड, आनंद मालेवार, रजनिश बन्सोड, सौ. नंदा झंझाड, बालु चुन्ने, सौ. आशा राजेश डोरले, अविनाश ब्राम्हणकर, श्री गंगाधरजी डोंगरे, सौ. दिपलता नंदकिशोर समरीत, सौ. लता विलास नरूले, सौ.त्रिवेणी पोहरकर, स्वाती मेश्राम, किर्ती नरेन्द्र गणवीर, रत्नमाला चेटुले, संजय बोंदरे, नागेश भगत, प्रभाकर बोदेले, मनिश गणवीर, स्वाती मेश्राम, पोर्णिमा वाहाने, किर्ती बोरकर, स्वप्नील नाशीने, बाळा गभने, गणेश चौधरी, मंजुषा बुरडे, अमन मेश्राम, आरजु मेश्राम, सोनू खोब्रागडे, अश्विन बांगडकर, हिमांशू मेंढे, गणेश बानेवार, हितेश सेलोकर, अरुण अंबादे, विक्की रावलानी, मधू चौधरी, दयानंद नखाते, ईश्वर कळंबे,मोसम ठाकूर, राजेश वासनिक, महेंद्र बारापात्रे, लोकेश नगरे, शुभम बागडे, अमन मेश्राम सहित राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी आणि भंडारा शहरातीलकार्यकर्ता बहुसंख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमा दरम्यान श्री प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर व पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेऊन भंडारा येथील महिला कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्ष प्रवेशीत श्रीमती अरुणा दुबे, स्वाती हेडाऊ, चंदा खोब्रागडे, ममता मेश्राम, मोना नागपुरे, रेणुका धकाते, प्रिती गोस्वामी, साहिन खान, रीजवाना शेख, आसमा शेख सर्व प्रवेशितांचे श्री पटेल जी यांनी पक्षाचा दुपट्टा वापरून पक्षात स्वागत केले.

Related posts