गोंदिया। आज डॉ चौरागडे लॉनं भागी ता. देवरी येथे तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला.
यावेळी संबोधित करतांना श्री जैन म्हणाले कि, केंद्र सरकार ने आज पेट्रोल व डिझेलच्या किंमती, घरगुती गॅस सिलिंडर चे दर वाढले आहे, जनता महागाईने त्रस्त झाली आहे. जनतेचे महांगाई ने कंबरडे मोडलेले आहे. भाजपा चे खोटे बोला पण रेटून बोला हे मंत्र आहे. प्रत्येक वर्षी २.५ कोटी रोजगार देऊ असे आश्वासन देऊन केंद्र सरकारने खाजगीकरणाचा सपाटा लावला आहे. खाजगीकरणाने बेरोजगार, युवक व सर्वसामान्य लोकांचा रोजगार संपुष्ठात येईल पण याचे कोणतेही सोयरसुतक अच्छे दिनाचे गाजर दाखवून सत्तेत आलेल्या ह्या सरकारला नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या जुमलेबाजी ला बळी न पडता जन हिताचे कार्य सुरू ठेवुन जनमानसात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा पोहचिण्याचे कार्य करावे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती व नगरपंचायत च्या निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचे प्रयत्न आपण सर्वानी मिळून करावे असे आवाहन मान्यवर महोदयांनी केले.
यावेळी सर्वश्री माजी आमदार श्री राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष श्री गंगाधर परशुरामकर, श्री नरेश माहेश्वरी, श्री केतन तुरकर, श्री रमेश ताराम सर्वश्री गोपाल तिवारी, सी. के. बिसेन, भैय्यालाल चांदेवार, सौ. पारबता चांदेवार, मुकेश खरोले, सौ. माधुरी शहारे, सौ. अर्चना ताराम, सौ. मंजुषा वासनिक, नेमीचंद अंबिलकर, इंदल अरकरा, दिलीप दुरूगकर, हिमांशू ताराम, सारंग देशपांडे, सौ. सुमन बिसेन, सुजित अग्रवाल, योगेश देशमुख, अरविंद शेंडे, सुबोध देशपांडे, पंकज शहारे, योगेश मेश्राम, अशोक चनावे, कान्हा बघेले, लव माटे, दर्पन वानखेडे, योगी येडे, मेश्राम जी, सौ. शर्मिला टेमभूर्णीकर, मनोहर राऊत, सौ. मीना कुंभरे, सौ. सीमा साखरे, सौ. शिल्पा चाकाते, सौ. खेलणंबाई नागपुरे, सौ. आरती जागडे, सौ. जायत्रा गावळ, सौ. सायत्रा गावळ, सौ. प्रभा धुर्वे, सौ. रोहिणी मेश्राम, सौ. छाया मडावी, सौ. सुंदरबाई येळे, सौ. लीला सोनवणे, सौ. सरिता सलामे, सौ. अंजिरा राऊत, सौ. बालिका सोनसार्वे, सौ. कौशल उके, सौ. सरस्वता कोसरे, सौ. शामकला वाघमारे, सौ. विदा अंबादे, निर्मल अग्रवाल, देवता शाहु, चंद्रपाल शहारे ,छगन अंबादे, राजेश आंबिलकर, सौ. खमित्रा टेम्भूर्णीकर, सौ. शिल्पा कोहळे, सौ. अनिता टेम्भूर्णीकर, सौ. बेबिनंदा साखरे, सौ. मीनाक्षी बिसेन व अन्य कार्यकर्ता उपस्थित होते.