गोरेगाव येथे राष्ट्रवादी कांँग्रेस पक्ष कार्यालयात पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक संपन्न, सेतू केंद्राचे उद्घाटन

206 Views

 

गोंदिया। आज गोरेगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात माजी आमदार राजेंद्र जैन व माजी खासदार डाॅ खुशालचंद्र बोपचे यांच्या माग॔दश॔नाखाली महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर पंचायत निवडणूकविषयी चर्चा करण्यात आली. तालुक्यातील प्रत्येक क्षेत्रात सक्षम उमेदवार उभे करणार असून विकास हाच राष्ट्रवादी काँग्रेस चा मुद्दा असेल असे संबोधनात श्री जैन म्हणाले. पक्षाची संघटणात्मक बांधणी करतांना बुथ कमेटी मजबुत करुन सक्रीय लोकांना संधी दिल्यास यश नक्की मिळते असे श्री बोपचे यांनी मत क्यक्त केले.

या बैठकीला माजी आमदार श्री राजेंद्र जैन, माजी खासदार श्री खुशालचंद्र बोपचे, सोबत सर्वश्री केवलभाऊ बघेले, रविकातं बोपचे, लक्ष्मणराव चंद्रिकापुरे, विशाल शेंडे, कुष्णकुमार बिसेन, बाबा बोपचे, सौ.कल्पना बहेकार, सौ. ललीता फुन्डे, आनंदराव बडोले, डाॅ संजय राहागडाले, पन्नालाल बोपचे, सोमेश राहागङाले, नितेश येल्ले, कमलेश बारेवार, अर्चना चौधरी, सुषमा अगडे, राजू पारधी ,बुधराम राऊत, रामभाऊ अगडे, गेदंलाल शेवते, उषा रामटेके, कल्पना शेवते ,मंजू अगडे, रंजना बारेवार, कादीर शेख, बबलू गौतम, प्रदिप चौरागडे , धनेश्वर तिरेले, भुमेश्वरी तिरेले, लालचंद चव्हाण, यु. जी. बिसेन, भोजराज चव्हान, ओमप्रकाश ठाकुर, समिर खान सहित असंख्य कार्यकर्ता उपस्थित होते. बैठकीचे संचालन कमलेश बारेवार व आभार नितेश येल्ले यांनी मानले.
———–
सेतू केंद्राचे उद्घाटन

आपले सरकार सेवा केंद्र डिजीटल सेवा केंद्राचे उदघाटन माजी आमदार राजेंद्र जैन व माजी खासदार श्री खुशाल बोपचे यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयातील सेतू केंद्रावर 60 वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी मोफत सुविधा राहणार आहे व इतर कामे शासकीय दरात होणार आहेत. यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती नगरपंचायत निवडणूकीत इच्छुकांनी आपापल्या नांवाची नोंद केली.

Related posts