गोंदिया: नागझिरा व्याघ्र प्रकल्प येथे आमदार रहांगडाले यांच्या हस्ते सफारी बसचे लोकार्पण

725 Views

 

तिरोडा:- जिल्हा वन पर्यटन विकास निधी अंतर्गत नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प चोरखमारा गेट येथे पर्यटकांना वनभ्रमंती साठी १५ सीटर बसचे लोकार्पण तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले गोंदिया जिल्ह्याला पर्यटनाचा खूप मोठा वारसा निसर्गाकडून प्राप्त असून न्यू नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला देश परदेशातून मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देत असतात.

एकाचवेळी १५ पर्यटकांना वनभ्रमण करण्यात यावा यासाठी जिल्हा वार्षिक निधी अंतर्गत बसची सोय करण्याबाबत आमदार विजय रहांगडाले यांचेकडे मागणी प्राप्त झालेली होती याची दखल घेऊन सदर मागणी जिल्हा वार्षिक निधी वन पर्यटन विकास निधी २०१९-२० अंतर्गत १५ पर्यटक क्षमतेची मिनी बस उपलब्ध करण्यात आली असून आज य बसचे लोकार्पण करून बससेवा सुरु करण्यात आली.

यावेळी नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे वन संरक्षक तथा संचालक मनिकंदा रामानुजम, वनसंरक्षक नियोजन व व्यवस्थापन नागपूर एस.युवराज, साकोली उपसंचालक पूनम पाटे, वनपरीक्षेत्राधीकारी भाविक छीवंदे, सामाजिक कार्यकर्ता उमेश पटले व व्याघ्र प्रल्पाचे कर्मचारी उपस्थित होते.

Related posts