तुमसर: केंद्र सरकारने वाढविलेल्या महागाई च्या विरोधात आवाज उठवुन व आपापसातील मतभेद विसरून पक्ष वाढविण्याचे कार्य करावे- खा. प्रफुल पटेल

265 Views

 

गभने सभागृह तुमसर येथे कार्यकर्ता बैठकीत साधला संवाद, अनेकांच्या एनसीपी प्रवेश..

प्रतिनिधि।

तुमसर। आज तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा च्या वतीने गभणे सभागॄह, तुमसर येथे खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक पार पडली. परिसरातील समस्यांवर कार्यकर्ता व पदाधिकारी यांनी सुचविलेल्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी खासदार श्री प्रफुल पटेल म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सदैव शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. शेतकर्‍यांच्या मालाला उचित भाव मिळण्यासाठी नेहमी प्रयत्न केले आहे. तसेच शेतकर्‍यांना न्याय देण्याचा काम केले आहे. शेतकऱ्यांची पिळवणूक करीत पेट्रोल व डिझेलच्या किमतीत भरमसाठ वाढ केल्याने उत्पादनाचा खर्च दुपटीने वाढलेले आहे. त्यामुळे या केंद्र सरकारने वाढविलेल्या महागाई च्या विरोधात आवाज उठवुन व आपापसातील मतभेद विसरून पक्ष वाढविण्याचे कार्य करावे. येणाऱ्या नगरपरिषद व जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र मिळून प्रयत्न करावेत.

काही दिवसांपूर्वी जलसंपदा मंत्री ना. श्री. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे झालेल्या बैठकीस स्वतः उपस्थित राहून भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील सिंचनाच्या कामांच्या प्रगतीबाबत आढावा घेतला. सुरेवाडा उपसा सिंचन लिफ्ट एरिगेशन वर पम्प हाऊस निर्माण करणे, गणेशपूर लिफ्ट एरिगेशन तयार करून बावनथडी प्रकल्पाचा उजव्या मुख्य कालव्याचे वितरिका निर्माण करणे, चुलबंध मध्य प्रकल्प डावा कालवा, धारगाव उपसा सिंचन, चांदपूर जलाशयातील कॅनल दुरुस्ती करून सिंचन क्षमता वाढविणे यावर चर्चा करण्यात आली व यासंबंधी योग्य कार्यवाही करीता अधिकार्यांना निर्देश देण्यात आले.

यावेळी सर्वश्री माजी सांसद मधुकर कुकडे, माजी आमदार राजेन्द्र जैन, आमदार राजूभाऊ कारेमोरे, धनजंय दलाल, अनिल बावनकर, सरिता मदनकर, देवचंद ठाकरे, ठाकचंद मुगुशमारे, धनेंद्र तुरकर, अभिषेक कारेमोरे, पमा ठाकुर, नेहा शेंडे, सरोज भूरे, निशिकांत पेठे, योगेश सिनगंजूड़े, सलाम तुरक, ख़ुशलता गजभिये, प्रवीण थोटे, राजेश देशमुख, यशीन छवारे, प्रदीप भरनेकर, श्वेता कहालकर, के. के. पंचबुधे, जयश्री गभने, चंदा डोरले, सुमित डेकाटे, पुष्पलता गजभिये, आशा बंसोड़, पप्पू भइसरे, मुकेश मलेवार, टिंकू ठाकुर, बिसन ठवकर, बाळा समरीत, शेखर टिभुड़े, शिशुपाल गौपाले, अवि पटले व पदाधिकारी, कार्यकर्ता उपस्थित होते।

आकाश पिकलमुंडे च्या सत्कार..

या कार्यक्रम प्रसंगी मोहाडी तालुक्यातील आकाश पिकलमुंडे यांची प्रो कब्बडी बंगाल वारियर्स मध्ये निवड झाल्याबद्दल शाल व श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला.

अनेक कार्यकर्ताच्या एनसीपी प्रवेश..

या कार्यकर्ता बैठकी प्रसंगी खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तुमसर तालुक्यातील अनेक कार्यकर्तानी प्रवेश केला. यावेळी श्री प्रफुल पटेल यांनी सर्व प्रवेशितांचे पक्षाचा दुपट्टा वापरुन स्वागत केले. प्रवेश मध्य सर्वश्री भुपेंद्र भुरे, मंगेश सिंधालोरे, संजयसिह कुशवाह, मयुर मेश्राम, प्रशांत मलेवार, अमोल मेहर, विजय गभणे, दिगांभर लांजेवार, गणेश धुर्वे, अशोक रणदिवे, कुणाल तुळणकर, विवेक सातोणकर, अनिकेत गाढवे, करण जुहार, अभय बडवाईक, सिद्दिकी शेख, मनोहर साठवणे, संजय नगरे, मोहम्मद जिशान शेख, मोहशिन शेख, जुबेर शेख, मो. रेहान शेख, मुन्ना वर्मा, यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.

Related posts