बैल बंडी मोर्चा काढून केंद्र सरकारचा निषेध
प्रतिनिधी:-
आमगांव। देशाचा पोशिंदा बळीराजाला उध्वस्त करणारा कायदा केंद्र सरकारने ताबडतोब मागे घ्यावा या सह विविध मागण्यांसाठी आमगाव तालुका काँग्रेसने शुक्रवारी बैल बंडी मोर्चा काढून केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.
मोर्चा चे नेतृत्व गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव ईसुलाल भालेकर, तालुका काँग्रेस अध्यक्ष संजय बहेकार, तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा सौ छबुताई उके, शहर काँग्रेस अध्यक्ष अजय खेतान, यांच्यासह जेष्ठ पदाधिकाऱ्यांनी केले. हा मोर्चा देवरी रोड वरील काँग्रेस कार्यालयातुन काढण्यात आला. बैलबंडी मोर्चा आंबेडकर चौक ते महात्मा गांधी चौक पासून तहसील कार्यालयात पोहचला.
यावेळी काँग्रेसचे आमदार सहसराम कोरोटे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालयासमोर घोषणा बाजी करण्यात आली. आमदार कोरोटे यांनी सांगितले की,भाजप प्रणित सरकार हुकूमशाही कडे वाटचाल करीत असून, भांडवलदारांना अनुकूल फायदे करूनदेत आहे. पारित केलेले विधेयक हे शेतकरी व शेतमजुरांवर अन्यायकारक आहे. या विधेयकाच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना संपविण्याचा प्रयत्न सरकार कडून केला जात आहे.या विधेयकाचा तालुका काँग्रेस निषेध करीत असल्याचे आमदारांनी सांगितले.यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यानी मोदी सरकारच्या विरोधात निदर्शने केली.
तसेच हाथरस येथे झालेल्या पीडित तरुणीवरील अत्याचार व हत्या प्रकरणी निषेध नोंदवला. तसेच हाथरस येथील पीडित तरुणीच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जाणारे काँग्रेसचे नेते राहुल गांधी व प्रियंका गांधी यांना उत्तरप्रदेश पोलिसांनी धक्का बुक्की करून अटक केली. ही घटना कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे लक्षण असल्याचे आरोप करीत या घटनेचाही निषेध केला. यानंतर शेती विषयक पारीत केलेली ते तिन्ही विधेयक मागे घेण्यात यावे अशा मागणीचे निवेदन तहसीलदार दयाराम भोयर यांचे मार्फत सरकार ला देण्यात आले. या आंदोलनात प्रामुख्याने – जमिल खान महेश उके, युवक काँग्रेसचे अध्यक्ष – उज्वल बैस , सौ. उषाताई भांडारकर, गणेश हुकरे . रवि अग्रवाल, बाबु मेंढे संजय डोये. रामकिशन शिवणकर . जगदिश चुटे . रामेश्वर शामकुवर. नरेश बोपचे .संतोष सतीशहारे, संदीप उके . हंसराज जोशी, दिवाकर चुटे, बाबुराव कोरे .अशोक नेवारे.रामदास गायधने . इत्यादी महिला .पुरूष मोठ्या संखेने मास्क व शोसल डिस्टंसिग चे नियम पाळुन सहभागी झाले.