गोंदिया: अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील पोलिसांच्या “नक्षल दमन विरोधी सप्ताह”, यशस्वी रित्या साजरा…

218 Views
प्रतिनिधि।
गोंदिया: माओवादी संघटनेतर्फ दिनांक २८ जुलै ते ०३ ऑगष्ट दरम्यान पाळण्यात येणाच्या “नक्षल शहीद
सप्ताहास” प्रतिउक्तर म्हणून गोंदिया जिल्हा पोलिस दलातर्फ श्री विश्व पानसरे, पोलीस अधिक्षक गोंदिया व श्री अशोक बनकर, अपर पोलीस अधिक्षक गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हयातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागातील आदीवासी नागरिकांनी नक्षलवाद्यांच्या भुलथापांना बळी न पडता नक्षल विचारसरणीचा विरोध व प्रशासनास सहकार्य करण्याचे उद्देशाने तसेच पोलीस-जनता संबंध अधिक सुदृढ होऊन पोलिस प्रशासना आपूलकीची भावना निर्माण व्हावी या दृष्टीने जिल्हयातील सर्व नक्षलग्रस्त पोलीस स्टेशन व त्याअंतर्गत येणा-या सशस्त्र दूरक्षेत्रांतर्गत “नक्षल दमन विरोधी सप्ताह” दिनांक २१/७/२०२१ पासून यशस्वी रित्या साजरा करण्यात आले आहे.
“नक्षल दमन विरोधी सप्ताह” दरम्यान वृक्षारोपन, नक्षलग्रस्त भागातील शाळेत प्रत्यक्ष भेट देवून
शाळेतीन विद्यार्थ्यांनां शिक्षणा/ खेळ विषयी मार्गदर्शन करण्यात आले. दुर्गम भागात नक्षलविरोधी बैनर/ पोस्टर लावून नक्षलविरोधी प्रोपगंडा करुन नक्षलवाद्यांचा निषेध करण्यात आला.
 ग्रामभेटी दरम्यान नक्षल विचारसरणीला बळी न पडण्याचे दृष्टीने तसेच नक्षल गावबंदी योजना राबविणयाबाबत व नक्षलग्रस्त भागातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आले. नक्षल हल्ल्यात शहिद झालेल्या पोलीस अधिकारी/ अंमलदार व सामान्य नागरिकांच्या कुटबियांची भेट घेण्यात आली. अशाप्रकारे विविध उपक्रम/कार्यक्रम राबवतात नक्षलग्रस्त भागात भयमुक्त वातावरण निमार्ण करण्यात आले. सदर सप्ताहाला नागरिकांचा स्वयंस्फृर्त प्रतिसाद मिळत आहे.
सदर नक्षल दमन सप्ताह मध्ये राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमा दरम्यान कोरोना विषाणुचे अनुसंगाने
Physical /Social Distancing. मास्क व इंतर प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे योग्य ते पालन करण्यात आले.
नक्षलग्रस्त भागातील नागरीकांनी नक्षलवादयांच्या भुलथापांना बळी न पड़ता, शासकीय योजनेचा लाभ
घेवून आपले जीवन सुकर करावे व शासनाच्या मुख्य प्रवाहात सामिल व्हावे, असे श्री विश्व पानसरे पोलीस
अधीक्षक, गोदिया यांनी जिल्हयालील जनतेला आवाहन केले आहे.

Related posts