गोंदिया: पावसाने दडी मारल्यामुळे खळबंदा जलाशयातील पाणी शेतीकरीता सोडण्यात आले, माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या प्रयत्नाला यश

347 Views

 

प्रतिनिधि।

गोंदिया: माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या प्रयत्नाने खळबंदा जलाशयाचे पाणी शेती करिता सोडण्यात आले. आज राजेंद्र जैन गोंदिया तालुक्याच्या दौऱ्यावर असतांना महालगांव येथे आले असता परिसरातील शेतकऱ्यांनी शेती करीता लागणाऱ्या पाण्याची समस्या त्यांच्या निदर्शनात आणून दिली. याची दखल घेत श्री जैन यांनी तात्काळ श्रीमती सोनाली सोनुले,कार्यकारी अभियंता गोंदिया पाटबंधारे विभाग, श्री संजीव सहारे, सहायक अभियंता व श्री डी.एस.लेंडे शाखा अभियंता खळबंदा यांना संपर्क करून जलाशयातील पाणी सोडण्याचे निर्देश दिले. लगेच संबंधित विभागाव्दारे जलाशयातील पाणी सोडण्यात आले.

पावसाने दडी मारल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची रोवणी खोळंबली आहे. झालुटोला, खळबंदा, दावनिवाडा, देऊटोला, बोदा गोंडमोहाळी, महालगाव, मुरदाडा धापेवाडा, लोधीटोला, पिपरटोला, बिजाईतोला, वळद, खतिटोला, सहेसपूर, सेजगाव,सोनेगाव, नहारटोला,अत्रि , परसवाडा, बोरा,डब्बेटोला, अर्जुनी, खैरलांजी, करटी, इंदोरा, बीबीटोला, हि सर्व गावे लाभक्षेत्रात येत असून या गावांना जलाशयाच्या पाण्याचा उपयोग होणार आहे. यावेळी श्री गुड्डू बोपचे, कृष्णकुमार जायस्वाल, प्रदीप रोकडे, नरहरप्रसाद मस्करे, नीरज उपवंशी, कृष्णकुमार ठकरेले, कान्हा बघेले, दिनेश लिल्हारे, परमानंद उपवंशी, भोजराज रहांगडाले, शंकरलाल टेभरें, तेजलाल लिल्हारे, रतनलाल पारधी, थनिराम माहले, मोरेश्वर नागपुरे, श्यामकलाबाई चौधरी व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Related posts