शेतकर्‍यांच्या हक्कासाठी भाजपाचे जिल्ह्यात धरणे आंदोलन..दहा दिवसात धान खरेदी न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

189 Views

 

गोंदिया, 27 मे
रब्बी धान उत्पादक शेतकर्‍यांचे धान आगामी दहा दिवसात खरेदी करावे, या प्रमुख मागणीसह शेतकरी हिताच्या विविध मागण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे जिल्ह्यातील आठही तालुक्यात धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान संबंधित अधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. दहा दिवसात धान खरेदी न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
गोंदिया येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजपा जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आ.डॉ.परिणय फुके, आ.विजय रहांगडाले, माजीमंत्री राजकुमार बडोले, माजी आ.हेमंत पटले, माजी आ.गोपालदास अग्रवाल, माजी आ.रमेश कुथे, नगराध्यक्ष अशोक इंगळे, जिल्हा महामंत्री संजय कुलकर्णी, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष दीपक कदम, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संजय टेंभरे, कोषाध्यक्ष दिनेश दादरीवाल, न प सभापती जितेंद्र पंचबुद्धे आदी उपस्थित होते. दरम्यान, मागण्याचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले.

निवेदनात, जिल्ह्यात रब्बी धानाची अंदाजे 65 हजार हेक्टरवर लावगड करण्यात आली असून अंदाजे 29 लक्ष क्विंटलचे उत्पादन अपेक्षित आहे. शेतकर्‍यांनी धानाची कापणी केलेली आहे. मात्र शासनाकडून आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करण्यास दिरंगाई झाल्याने त्यांना आपले धान पडक्या किंमतीत विकावे लागत असल्याने त्यांचे मोठे नुकसान होत आहे. धान खरेदी केंद्राचे उद्धाटनाच्या फोटोसेशनमध्ये सरकारमधील नेते धन्यता मानत आहे. मात्र प्रत्यक्षात धानाची खरेदीच सुरु झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व धान खरेदी केंद्रावरुन येत्या दहा दिवसात धान खरेदी सुरु करण्यात यावी. यासोबतच धानावरील बोनस जाहीर होऊन आठ महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र अद्यापही बोनस मिळाला नाही. तो त्वरीत शेतकर्‍यांचा खात्यात जमा करण्यात यावा, नियमीत कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहन अनुदान त्वरीत देण्यात यावे, शेतकर्‍यांना विद्युत जोडणी तातडीने देण्यात यावी, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे.

येथील नवीन प्रशासकीय इमारतीसमोरील धरणे आंदोलनात ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनलाल ठाकरे, दवनीवाडा मंडळ अध्यक्ष धनेंद्र अटरे, शहर अध्यक्ष सुनील केलनका, अशोक हरिणखेडे, मनोज मेंढे, सुधीर ब्राम्हणकर, देवचंद नागपुरे, योगराज रहांगडाले, अर्जुन नागपुरे, अतुल दुबे, जगदीश अग्रवाल, गोल्डी गावन्डे, मुजीब पठाण, शंभूशरण ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अर्जुनी मोर : अर्जुनी मोर येथे तहसील कार्यालयासमोरील धरणे आंदोलनात प्रदेश कार्यकारिणी सदस्य रचना गहाणे, जिल्हा महामंत्री लायकराम भेंडारकर, तालुकाध्यक्ष अरविंद शिवणकर, रघुनाथ लांजेवार, डॉ.गजानन डोंगरवार, प्रकाश गहाणे, खुशाल काशीवार, गिरीश बागडे, पोमेश रामटेके, रामदास कोहाडकर, मुरलीधर ठाकरे, मीना शहारे, रामकिसन देशमुख, रमेश मस्के, सुरेश नाकाडे आदी उपस्थित होते.

तिरोडा : येथील तहसील कार्यालयासमोरील धरणे आंदेलनात तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, बाजार समिती सभापती डॉ.चिंतामन रहांगडाले, उपसभापती विजय डिंकवार, शहर अध्यक्ष स्वानंद पारधी, डॉ.वसंत भगत, महिला मोर्चा अध्यक्ष तुमेश्वरी बघेले, राजेश मलघाटे, डॉ.बी.एस.रहांगडाले, पवन पटले, प्यारेलाल पटले, घनश्याम पारधी, तेजराम चव्हाण, संजयसिंह बैस, संजय नागदेवे, दिगंबर ढोक, भरत गुरव, रमणिक सयाम, महादेव कटनकार, शिवलाल परिहार, जितू टेंभेकर, पिंटू रहंगडाले आदी उपस्थित होते.

आमगाव : येथील तहसील कार्यालयासमोरील धरणे आंदोलनात माजी आ. भेरसिंग नागपुरे, तालुकाध्यक्ष काशीराम हुकरे, महामंत्री नरेंद्र वाजपेयी, राजु पटले, पिंटू अग्रवाल, लक्ष्मण चुटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
देवरी : येथील तहसील कार्यालयासमोर प्रदेश सचिव तथा माजी आ. संजय पुराम यांच्या नेतृत्वात तालुकाध्यक्ष अनिल येरणे, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद संगीडवार, महामंत्री प्रविण दहीकर, जिल्हा सचिव यादवराव पंचमवार, राजेश चांदेवार, माजी नगराध्यक्ष कौशल्या कुंभरे, विनोद भेंडारकर, देवेंद्र हिरवानी, श्रीकृष्ण हुकरे, बंटी भाटिया आदी आंदोलनात सहभागी झाले.

सालेकसा : येथील तहसील कार्यालयासमोरील आंदोलनात तालुकाध्यक्ष गुणवंत (मुन्ना) बिसेन, महामंत्री यादन नागपुरे, भाजयुमो तालुकाध्यक्ष आदित्य शर्मा, रमेश चुटे, काशीभाऊ पाथोडे, बबलू शिवणकर आदी उपस्थित होते.


गोरेगाव : येथील तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनात तालुकाध्यक्ष साहेबलाल कटरे, डॉ.लक्ष्मण भगत, रेखलाल टेंभरे, विश्वजीत डोंगरे, संजय बारेवार, मोरेश्वर कटरे, सुरेंद्र बिसेन आदी उपस्थित होते.
सडक अर्जुनी : सडक अर्जुनी येथे भाजपच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना मागण्याचे निवेदन सोपविले. यावेळी जिल्हा सचिव शेषराव गिर्‍हेपुंजे, महामंत्री गिरीधर हत्तीमारे, महामंत्री शिशिर येडे, माजी पंस सभापती कविता रंगारी, भाजयुमो जिल्हा महामंत्री हर्ष मोदी, भाजयुमो अध्यक्ष विलास बागडकर, मोहन भेंडारकर आदी उपस्थित होते.

Related posts