रेमडेसिविर इंजेक्शन मिळाले, गोंदिया – भंडारा जिल्ह्याला प्रत्येकी १ हजार इंजेक्शनचा पुरवठा- खा.पटेलांनी शब्द पाळले

2,266 Views

 

प्रतिनिधि। 17 अप्रैल

गोंदिया। गोंदिया-भंडारा या दोन्ही जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. हिच बाब लक्षात घेत खा. प्रफुल्ल पटेल यांनी त्वरित ZYDUS CADILA कंपनीच्या मालकांशी चर्चा करुन रेमडेसिविर इंजेक्शनचा स्टॉक उपलब्ध करुन देण्यास सांगितले. त्यानंतर दोन्ही जिल्ह्यांसाठी रेमडेसिविर इंजेक्शन शनिवारी २ हजार इंजेक्शन उपलब्ध करुन देण्यात आले असून खा. प्रफुल्ल पटेल यांनी दिलेला शब्द पाळला.
खा. प्रफुल्ल पटेल यांनी गोंदिया आणि भंडारा या दोन्ही जिल्ह्यासाठी प्रत्येकी १ हजार रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करुन दिले. तसेच रुग्णांना हे इंजेक्शन शासनाने निर्धारित केलेल्या दरातच उपलब्ध करुन देण्याचे निर्देश आहेत. तसेच यानंतरही रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होणार असून जुबलीयंट कंपनीने सुध्दा ५० – ५० इंजेक्शन उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले आहे. सन फार्माने ४ रुग्णालयांना 200 इंजेक्शनचा पुरवठा खा. प्रफुल्ल पटेल यांच्या चर्चेनंतर केला आहे. गोंदिया आणि भंडार जिल्ह्यात सुद्धा रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी गोरगरीब आणि सामान्य रुग्णांची परवड होत आहे. हिच बाब लक्षात घेत खा. प्रफुल्ल पटेल यांनी *ZYDUS CADILA* कंपनीच्या मालकांशी चर्चा करुन रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करुन देण्यास सांगितले. त्यानंतर या कंपनीने दोन्ही जिल्ह्यासाठी रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करुन दिले आहे. विशेष म्हणजे माजी आ.राजेंद्र जैन यांनी सुद्धा जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला असल्याची बाब खा. प्रफुल्ल पटेल यांच्या लक्षात आणून दिली होती. खा. प्रफुल्ल पटेल यांचे दोन्ही जिल्ह्यातील कोविड परिस्थितीवर लक्ष असून ते याचा सातत्याने आढावा घेऊन आरोग्य विषयक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करित आहे.
……..
निर्धारित दरानेच होणार पुरवठा

गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील सर्व मेडिकलमध्ये रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करुन देण्यात आले असून त्याची शासनाने निर्धारित केलेल्या दरानेच ग्राहकांना विक्री करण्यात येणार आहे. त्यासाठी ग्राहकांना सुद्धा अतिरिक्त पैसे मोजावे लागणार नसल्याचे माजी आ. राजेंद्र जैन यांनी सांगितले.

Related posts