जबलपुर -चांदापोर्ट चा अर्जुनी/मोर.विधानसभा क्षेत्रातील मुख्य रेल्वे स्थानकावर थांबा द्यावा- शिवसेना उपजिलाप्रमुख शैलेश जायस्वाल

653 Views
प्रतिनिधि।
अर्जुनी/मोर.।  8 मार्चपासुन नव्याने सुरु करण्यात आलेल्या जबलपुर- चांदापोर्ट या अतीमहत्वाचा रेल्वे गाडीचा अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रातील नवेगांवबांध, सौंदड, व अर्जुनी मोर. रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात यावा अशी मागणी रेल्वे प्रवाशांचे वतीने शिवसेनेचे गोंदिया जिल्हा उपप्रमुख शैलेश जायस्वाल यांनी केली आहे.
     कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षेभरापासुन गोंदिया-चांदापोर्ट ही पॅसेंजर गाडी बंद आहे.त्यामुळे या लोहमार्गावरील प्रवाशांना फार त्रास सहन करावा लागत असुन आर्थिक भुर्दड सुध्दा बसत आहे.त्यामुळे नव्याने सुरु झालेल्या जबलपुर-चांदापोर्ट या रेल्वेगाडीला या मार्गावरील अर्जुनी मोर, नवेगांवबांध, व सौंदड या प्रमुख रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात यावा आणी गोंदिया-चांदापोर्ट ही प्रवासी रेल्वेगाडी त्वरीत सुरु करावी अशी मागणीही शैलेश जायस्वाल यांनी केली आहे.
   जबलपुर-चांदापोर्ट ह्या रेल्वे एक्सप्रेस चा नैनपुर सारख्या लहान स्थानकावर थांबा देण्यात आला.मात्र अर्जुनी मोर. सारख्या विविधतेने नटलेल्या तालुक्यात या एक्सप्रेस चा थांबा मिळु नये, हे दुर्दैव आहे. अर्जुनी मोरगाँव हे विधानसभा क्षेत्र असुन निसर्ग सौंदर्याने नटलेला नवेगांवबांध राष्ट्रीय उद्यान, नागझिरा व्याघ्र प्रकल्प, ऐतिहासिक प्रतापगड व निर्वासितांचे तिबेटियन स्थळ व विविध पर्यटनस्थळ असल्याने महाराष्ट्रासह विभिन्न राज्यातील भाविक व पर्यटक मोठ्या संख्येने या तालुक्यात येतात. मात्र एकमेव लोहमार्गावरील प्रवासी व एक्सप्रेस गाड्यांच्या अर्जुनी मोर तालुक्यात थांबा नसल्याने पर्यटक व भावीकासह या मार्गावरील प्रवाशांची मोठी कुचंबणा होत आहे.
  रेल्वे विभागाने जबलपुर-चांदापोर्ट ही गाडी आता आठवड्यातून तिन दिवस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीचा आठ मार्चपासुन शुभारंभ झाला आहे. मात्र गोंदिया ते चांदापोर्ट या 250 किमीच्या अंतरावर या गाडीला कुठेच थांबा देण्यात आला नाही. त्यामुळे प्रवाशांच्या दृष्टीने या मार्गावरील महत्वपूर्ण स्थानक समजल्या जाणा-या अर्जुनी मोर. वडसा, नवेगांवबांध, सौंदड या रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात यावा अशी मागणी रेल्वे प्रवाशाचे वतीने शिवसेनेचे गोंदिया जिल्हा उपप्रमुख शैलेश जायस्वाल यांनी केली आहे.

Related posts