गोंदिया: जागतिक महिला दिवस, 427 महिलांना दिली कोविड लसी ची संजीवनी..

178 Views
प्रतिनिधि।
गोंदिया। अंतराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्याने 8 मार्चला जिल्हा आरोग्य प्रशासन ने आज खास मातृशक्ति करीता मोफत कॉविड लसीकरण कॅम्प आयोजित केले होते.
या कॅम्प चे उदघाटन जिल्हा दिशा समितीच्या अध्यक्ष भावनाताई कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन कापसे, डॉ. सुशांकी कापसे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर, वैद्यकीय महाविद्यालयच्या डॉ. शिल्पा पटोरिया, डॉ. मनोज टाळपल्लीवार आदी प्रमुख्याने उपस्तीत होते.
   कॉरोना पेंडेमिक मध्ये प्रतिकूल परिस्तिथीत सुद्धा सर्व महिला आरोग्य कर्मचाऱ्यांनी स्वतः ची जीवाची पर्वा न करता पेशंट ची सेवा केली. त्याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबरीश मोहबे यांनी सर्व महिला डॉक्टर्स व नर्सेस यांचे जागतिक महिला दिनाच्या पर्वा वर हार्दिक अभिनंदन केले.
    डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी महिलांना आवाहन केले की अजून कॉरोनाचा धोका टळलेला नाही, तेव्हा आपली आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी घ्या, काळजी घ्या. त्यासाठी घरातील 60 वया व वरील नातेवाईक याना लसीकरण करण्यास प्रवृत्त करावे.  महाराष्ट्र सरकारने 8 मार्च महिला दिनी खास  व्यवस्था म्हणून कॉविड लसीकरण कॅम्प चे आयोजन केले आहे, त्याचा लाभ जरूर घेणे कारण लस हाच शेवटचा उपाय आहे.
     भावनाताई कदम यांनी स्वतः कोविड लस सर्वप्रथम घेतली आणि मग त्यानंतर संदेश दिला, ‘मी पण कॉविड लस घेतली तुम्ही पण लवकर नोंदणी करून घेणे लस सुरक्षित आहे’. त्यानंतर  निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्ण हुबेकर यांचे हस्ते श्रीमती कुमुदबेन मेहता यांना कॉविड लसीकरण करण्यात आले.
  लाभार्थी यांना 30 मिनिट्स निरीक्षण करण्यात आले व त्यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या  स्पेशल कॅम्प साठी डॉ.शिल्पा पाटोरिया व डॉ. सुवर्णा हुबेकर यांनी अथक परिश्रम करून 208 महिलांना यशस्वीवपणे लस टोचवली व कॉरोना संजीवनी दिली. याच प्रकारे तिरोडा येथे 55, खमारी येथे 74, आमगाव येथे 43 व बीजीडब्ल्यू दवाखान्यात 47 महिलांना कॉविड लसीकरण करून 427 महिलांना एकाच दिवशी लसीकरण करण्याचा रेकॉर्ड केला.
   कॅम्पस यशस्वी करण्यासाठी रुपाली टोने, पल्लवी वासनिक, विनय अवस्थी, पल्लवी राऊत, सचिन गौतम, प्रियंका राजपूत आदी टीम ने परिश्रम घेतले.

Related posts