गोंदिया: भर पावसातही बिरसी वासियांचे आंदोलन सुरूच, विमानतळ व जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष

694 Views

 

प्रतिनिधि।
गोंदिया -ता.17 – मागच्या पंचेवीस दिवसापासुन सुरू असलेले बिरसी वासियांचे आंदोलन भर पावसातही सुरू आहे.आंदोलन कर्ते पावसात व गार थंडीत मोठ्या प्रमाणात हाल-अपेष्टा सहन करीत असून सुद्धा जिल्हा व विमानतळ प्रशासनाला या आंदोलनाची तीळ मात्र चींता दिसून येत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

चौदा वर्ष काम करूनही विमानतळ प्रशासनाने कामावरून काढल्याने विशाल सुरक्षा रक्षक कामगार संघटना यांच्या वतीने आपल्याला पुन्हा कामावर घेण्याच्या मागणीसाठी एकोणविस जानेवारी पासून तर
आपले चौदा वर्षांपासून रखडलेले पुनर्वसन तात्काळ करण्यात यावे या मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांनी अठ्ठावीस जानेवारी पासुन विमानतळ गेट समोर आंदोलनाला सुरवात केली आहे .

या आंदोलनाला स्थानिक आमदार विनोद अग्रवाल, विमानतळव्यस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष तथा खासदार सुनील मेंढे तसेच जिल्ह्यातील विविध संघटनाना व पद्धधिकार्यांनी भेटी देऊन आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला. तसेच खासदार सुनील मेंढे यांनीही आंदोलन कर्त्यांचे प्रश्न दिल्ली दरबारात उचलून तात्काळ सोडवून देऊ असे आश्वासन हि त्यांनी आंदोलन कर्त्याना दिले. या आस्वासनाना पंधरा दिवसाचा काळ लोटला तरी अजूनही या आंदोलनाचा कोणताही तोडगा निघाला नाही त्यामुळे आजही हे दोनही आंदोलन सुरूच आहेत. आता लोकप्रतिनिधी नी दिलेले आस्वासन केवळ भूलथापा तर नाही ना? अशी शंका हि आंदोनकारी घेत आहेत.

मध्यंतरी आंदोलन कर्त्यानी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोनात अनेक आंदोलकांच्या प्रकृती ढासळल्या होत्या हे विशेष. तरीपण प्रशासनाने या आंदोलनाकडे पाठ फिरविली असल्यामुळे आपले प्रश्न कुणाकडे मांडावे असा प्रश्न आंदोलनकर्त्यांनी विचारला आहे.

दरम्यान बुधवार पासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झाली आहे. त्यातच कडाक्याची थंडी ,अशा बिकट परिस्थितीत हि आंदोलनकर्ते आपल्या कुटुंबासहित अगदी उपवासी पोटी आंदोलन स्थळी ठाम मांडून बसुन आहेत. आंदोलन कर्त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन आतातरी जिल्हा व विमानतळ प्रशासनाने आंदोलकांचे प्रश्न मार्गी लावावे अशी मागणी आंदोलन कर्त्याना लावून धरली आहे.

Related posts