राईस मिलर्सच्या मागण्या मार्गी लावणार : खा. प्रफुल पटेल

711 Views

खा. प्रफुल पटेल व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थित बैठक

मुुंबई।  पूर्व विदर्भातील राईस मिलर्स असोसिएशनने मागील वर्षीचे थकीत इन्सेटिव्ह देण्यात यावे, धान भरडाईचे दर निश्चित करावे आणि मागील तीन वर्षांपासून थकीत असलेेले वाहतूक भाडे देण्यात यावे. या मागणीला घेवून राईस मिलर्सने शासकीय धानाची उचल करुन भरडाई करणे बंद केले आहे.

याच विषयावर तोडगा काढण्यासाठी खा. प्रफुल पटेल यांच्या पुढाकाराने मुंबई मंत्रालयात मंगळवारी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थित बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ना.भुजबळ यांनी राईस मिलर्सच्या सर्व समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

राईस मिलर्स असोसिएशनच्या मागण्यांवर त्वरीत तोडगा निघून शासकीय धान भरडाईची समस्या दूर व्हावी याचा फटका शेतकऱ्यांना बसू नये यासाठी मंगळवारी (दि.१६) मुंबई मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, खा. प्रफुल पटेल, पाचही जिल्ह्यातील राईस मिलर्स असोसिएशनचे पदाधिकारी व अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत राईस मिलर्सच्या सर्व मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच या मागण्यांना प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन ना.भुजबळ यांनी राईस मिलर्स असोसिएशनच्या सदस्यांना दिले. तसेच आंदोलन मागे घेत शासकीय धान खरेदी केंद्रावरुन धानाची उचल करुन भरडाई करण्यास सांगितले. त्यामुळे आता राईस मिलर्सचे आंदोलन लवकरच मागे होण्याची शक्यता आहे.

या वेळी मा. ना. श्री छगन भुजबळ, मा. खा. श्री प्रफुल पटेल सोबत मा. ना. श्री नितिन राऊत, आमदार श्री राजू करेमोरे ,मा. प्रधान सचिव सहकार पणन, मा. प्रधान सचिव आदिवासी विकास विभाग व् अन्य अधिकारी बैठकात उपस्तिथ होते।

Related posts