गोंदिया: राष्ट्रीय पवार(पोवार)महासभेला गावपातळीवर नेण्यासाठी गावसमित्या गठित करण्यावर भर…..कृषी, शिक्षण व व्यापारिक क्षेत्रात समाजातील युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी शिबिर..

321 Views

समाजातील कुरुतीवर आळा घालण्यासाठी सामाजिक आचारसंहिता पाळण्याचा निर्णय

प्रतिनिधि।
गोंदिया – राष्ट्रीय पवार(पोवार) क्षत्रिय महासभेला गावपातळीवर नेऊन गावसमित्या तयार करण्यासोबतच समाजाच्या जिल्हा ते तालुकास्तरावर असलेल्या सर्व संघटनांना महासभेचे सदस्यत्व देऊन समाज संघटनेला बळकट करण्यासोबतच सामाजिक संस्कृती व विचारधारा टिकवून ठेवण्यासाठी सर्वांना एकत्र काम करण्यावर कोरोना काळात पार पडलेल्या पहिल्या सभेत सर्सवंम्मतीने निर्णय घेण्यात आले.सोबतच महासभेच्या ३ सतत बैठकांना गैरहजर राहणाèयांना पदमुक्त करण्यात यावे सोबतच विस्तारासाठी तीन सदस्यीय समिती तयार करुन प्रत्येकांना जिल्हे वाटप करण्यावर चर्चा करण्यात आली. येथील तुलसी शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात रविवार(दि.२९)कोवीड-१९ चे नियम पाळत सभा घेण्यात आली.राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभा बैठकिच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेचे राष्ट्रिय अध्यक्ष इंजि.मुरलीधर टेंभरे होते.मंचावर उपस्थित राष्ट्रीय संघटन सचिव खेमेंद्र कटरे,राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र पटले,अशोक बिसेन, मोतीलाल चौधरी उपस्थित होते.
    बैठकीत महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष इंजि.टेंभरे यांनी आजपर्यंत महासभेच्यावतीने करण्यात आलेल्या समाजपयोगी हिताचे निर्णयाची माहिती देत देशातील सर्व पवार,परमार समाजाला एकत्र आणण्यावर भर असल्याचे सांगितले.सोबतच समाजामध्ये सध्या सुरु असलेल्या काही प्रथांवरील अवडंबर होणारा अनाठायी खर्चावर नियंत्रण आणण्यासोबतच गावपातळीवर समित्या गठित करुन महासभा लोकाभिमूख करण्यासाठी प्रयत्न करण्यासोबतच सदस्य संख्या वाढविण्यावर भर असल्याचे सांगितले.बैठकीमध्ये कृषी,शिक्षण क्षेत्रात आपल्या समाजाला बळकट करण्यासाठी समित्यांच्या माध्यमातून तसेच शिबिराच्या माध्यमातून माहिती देण्यासाठी नियोजन करण्यावर अनेकांनी सुचविलेल्या उपायावर सकारात्मक चर्चा करण्यात आली.समाजातील विवाहपध्दतीत होत असलेले अवडंबर,महासभेला गावपातळीवर नेणे आदी बैहर अधिवेशनात पारीत करण्यात आलेल्या ठरावावर चर्चा करुन बैठकीत मान्यता देण्यात आली.तसेच बैहर अधिवेशनाचे व महासभेच्या गेल्या आर्थिक वर्षाच्या जमा खर्चाची माहिती देण्यात आली.
     सिवनी संघटनेचे अध्यक्ष हरकचंद टेंभरे,एल.एस.राणा यांनी मृत्यूभोज एैवजी तिरथभोज शब्दाचा वापर करुन त्यावर होणारा खर्च हा सर्वांना अनाठायी न करता आपल्याला परवडेल असेच करावे असे विचार मांडले.राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेद्र पटले यांनी लग्नात होणारी प्रिवेडींग प्रथा बंद करण्यावरही विचार व्यक्त केले.शिक्षणावर भर देत आर्थिक कमजोर मुलासांठी संघटनेने पुढाकार घ्यावे असेही म्हणाले.प्रकाश रहागंडाले यांनी आपला समाज कृषीच्या क्षेत्रात अग्रसर असल्याने त्या दृष्टीने नियोजन करुन गावसमितीवर भर देण्याची सुचना केली.इंदोर येथील अर्पण बिसेन यांनी कृषी क्षेत्रात संधी असून या क्षेत्रातून व्यापारिक संधी निर्माण होत असल्याचे सांगत यावर समाजातील युवकांना मार्गदर्शनाची गरज असल्याचे सांगितले.गोलू नागरे यांनी पंवार पोवार समाज हा शेतीतूनच प्रगती साधू शकते,यासाठी शेतीला व्यवसायिक अभ्यासक्रमाची गरज असून त्यासंबधातील शिबिराची गरज असल्याचे सांगितले.सेवानिवृत्त समाजबांधव युवकांना शेतीतून रोजगार देऊ शकतात असेही म्हणाले.एड.रुपेंद्र कटरे यांनी प्रशासनिक सेवेसोबतच उच्च शिक्षणात आपली मुले कशी जातील यासाठी शिक्षण समिती गठित करुन कॅरियर गायडंस शिबिराची आवश्यकता सांगितले.जनसंवाद सचिव सुनिल गौतम यांनी महासभेचे मुख्यालय प्रत्येक जिल्ह्यात असलेल्या स्थानिक समाजभवनातच सुरु करण्यासंबधी सुचना केली.युवा व महिला समितीचे कार्य समाजात असायला हवे असेही म्हणाले.तसेच ते ३ बैठकांना गैरहजर राहतात त्यांना निलqबत करण्याची मागणी केली.राष्ट्रीय उपाध्यक्ष मोतीलाल चौधरी यांनीही ४५ सदस्याच्या विविध १५ समित्या तयार करुन सर्वांना काम वाटप करुन देण्याची मागणी केली.पृथ्वीराज रहागंडाले यांनी सोशल मिडियातील व्हाटसअपवर सुरु असलेली चर्चेवर नियंत्रणाची गरज असल्याचे तसेच महासभेशिवाय दुसरे कुठलेच संगठन मोठे नाही हे समाजाला पटवून देण्यावर भर दिले.दिलीप रहागंडाले यांनी शिक्षणात ओबीसी सवर्गांचा लाभ विद्याथ्र्यांना मिळायला पाहिजे,तसेच शासकीय मदत मिळायला हवे असे विचार मांडले.
    सभेला पंवार,पवार समाज जोडो समन्वय समितीचे लेखसिंह राणा,सहकोषाध्यक्ष दिलीप रहागंडाले,जनसवांद सचिव सुनिल गौतम,सुखदेव पारधी,सहसचिव इंजि.सुरेश देशमुख,जितेंद्र बिसेन,कार्यकारीणी सदस्य अर्पण बिसेन,एड.रुपेंद्र कटरे,उषा पटले,मनोज चव्हाण,प्रकाश रहांगडाले,गोलु नागरे, सिवनी पवार समाज संगठन अध्यक्ष हरकचंद टेंभरे,मनोज चव्हाण,विशाल बिसेन,दिनदयाल पारधी,लालु कटरे,रंजीतलाल गौतम,प्रेमलाल बोपचे,प्रीतपाल बघेले,श्रवण ठाकूर,दसाराम ठाकरे,विश्वजीत फुंडे,विजय पारधी,एड मनिषा पारधी,राजेद्र गौतम,प्रा.राजेंद्रसिंह पटले,नारायण पवार,देवीलाल उपस्थित होते.सभेचे प्रास्तविक व संचालन राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभेचे राष्ट्रीय संगठन सचिव खेमेंद्र कटरे यांनी केले.

Related posts