घड्याळला पुन्हा निवडून आणा, पुढील पाच वर्षात पाच हजार कोटी निधी देणार- डीसीएम अजित पवार

304 Views

 

५० हजार महिला -पुरुषांची उपस्थिती- खासदार प्रफुल्ल पटेल ही गरजले

तुमसर : तुमसर -मोहाडी विधानसभे करिता आता पर्यंत तीन हजार कोटींचा निधी मिळाला असून आगामी काळात मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाकरिता पाच हजार कोटींच्या निधी देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी दिली. लाडक्या बहिणीच्या सर्वांगीण विकासाकरिता व सक्षमीकरणाकरिता निधी कमी पडू दिला जाणार नाही. केवळ तुमचे आशीर्वाद आमदार राजू कारेमोरे यांच्या पाठीशी असू द्या असे आवाहन अजित दादा पवार यांनी केले. ते तुमसर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे (अजित पवार गट)जन सन्मान यात्रेनिमित्त नेहरू क्रीडांगणावर आयोजित जनसभेला संबोधित करताना बोलत होते. तत्पूर्वी सभेत दाखल होतांना उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार राजु कारेमोरे यांच्या हाताला येथिल उपस्थित महीलानी राख्या बांधल्या.

यावेळी मंचावर खासदार प्रफुल्ल पटेल आमदार राजू कारेमोरे, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, माजी आमदार राजेंद्र जैन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुधे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, प्रशांत पवार, धनंजय दलाल, सरीता मदनकर, यशवंत सोनकुसरे, जयंत वैरागडे देवचंद ठाकरे सभापती रितेश वासनिक, नेहा शेंडे, सदाशिव ढेंगे, योगेश सिंगनजुडे, राजेश देशमुख, यासीन छवारे, प्रदिप भरनेकर, वैभव कारेमोरे, प्रणव कारेमोरे, सागर गभने, नानु परमार, अविनाश पटले, बाळा समरीत, जि.प सदस्य राजेंद्र ढबाले, अनिता नलगोपुलवार उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार पुढे म्हणाले, तुमसर- मोहाडी मतदारसंघाचे आमदार राजू कारेमोरे यांनी तीन हजार कोटींच्या निधी विकास कामाकरिता आणला होता. कोरोनात तसेच एक वर्ष सत्ते बाहेर होतो असे दोन वर्षे वाया गेले. तुमसर मतदारसंघात घड्याळला पुन्हा निवडून आणा पुढील पाच वर्षात पाच हजार कोटीच्या निधी दिला जाईल. नागरिकांना गुणवत्ता पूर्ण सेवा देण्याच्या प्रयत्न असून सर्व जातीच्या महिलांना सक्षम करायचे आहे. त्याकरिताच लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेमुळे विरोधकांच्या पोटाला चिमटा लागला आहे. लाडक्या बहिणी सबळ होतील त्याकरिता अर्ज देण्याची मुदत ३० तारखेपर्यंत वाढविली आहे. त्यांना एकाच वेळेस ४५०० रुपये मिळतील. आर्थिक स्वावलंबी योजनेत वर्षाला १८ हजार रुपये देणार आहे. काँगेस वालांच्या मनात मळमळ आली आहे ते योजना चालू देणार नाही असे म्हणतात. लाडकी बहीण योजनेकरिता ४६ हजार कोटी रुपये दिले आहेत.

वर्षाला तीन गॅस सिलेंडर योजना: गोरगरिबांच्या मुलींना मोफत शिक्षण देण्या ची योजना, लेक लाडकी योजना, लखपती दीदी, आथिर्क सुबत्ता येण्यासाठी शेतकऱ्यांना मोफत विज, बिल मागचे देणे पुढचे देणे नाही. दुधाला पाच रुपये लिटर भाव वाढवून देण्यात आला त्यात आणखी वाढ करून ७ रुपये केलें. धानाला बोनस देणार आहे. धानाची भरडाईचा दर ५० केला. राशन दुकादारांचे कमिशन वाढविण्याचे विचार करू. जल पर्यटनाकरिता गोसे खुर्दला १०१ कोटी दिले. वैंनगंगा जल पर्यटन सुरु करणार आहोत. जास्त मतांनी निवडून आणा मी जास्त निधि देईन. विरोधकांवर टीका करत नाही कारण आमची विकास कामे खूप आहेत राष्ट्रवादी महा हेल्प लाईन सुरु केलें आहे. त्यात सर्व सर्व योजनांची माहिती दिली आहे. लोकसभेला तुम्ही दूर गेला होता. आम्हीं संविधान बदलणार नाही. संविधानाने आपल्याला एक संघ केला आहे .अल्पसंख्यांक लोक, मागासवर्गीय आदिवासीं समुदायाकडे विशेष लक्ष असून केंद्रात सरकार आहे तर राज्यात युतीची सरकार आणावी लागेल. त्याकरिता महायुतीच्या पाठीशी राहण्याचे आवाहन अजितदादा पवार यांनी केले.

तुमसर – मोहाडीला बारामती करणार- आमदार राजू कारेमोरे

शेतकऱ्यांना मिळणारी हेक्टरी मदत २० हजार रुपयावरून ३० हजार रुपये करावे, विजेचा प्रश्न, पाणी पुरवठा, आंधळगाव जलाशय, सोरणा जलाशयामुळे १२ गावाचा प्रश्न लिफ्ट एरिकेशनमूळे दीड हजार हेक्टर शेत जमीन ओलित होणार आहे. धान खरेदी केंद्राचे गोदामाचे भाडे दहा वर्षापासून मिळाले नाही, घटचे निकष बदलण्याची गरज असून तुमसर- मोहाडी तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली. वैनगंगा नदीच्या काठच्या गावाचे पुनर्वसन करणे, नदी वर बॅरेज बांधणे, आदिवासीं बांधवांना पट्टे देणे,
ग्रामविकास मंत्रालयाने २५१५ मधून निधि उपलब्ध करून देणे, शहर विकासा साठी ५०० ते ६०० कोटीची गरज आहे ती देणे .घरकुल निधी वाढविणे,ग्रा.प सदस्याचे मानधन वाढविणे, पाच वर्ष आम्हाला निधि मिळत राहिला तर सहाव्या वर्षी आम्ही निधी मागणारे नाही तर देणारे बनू प्रत्येक विभागाचे अडचणी सांगून ते सोडविण्याची मागणी केली. कृषी, आरोग्य व शिक्षण यांची सोय करावी बाजार समितीच्या अडचणी दूर करावी आगामी काळात तुमसर व मोहाडी तालुक्याला निश्चितच महाराष्ट्रातील दुसरी बारामती करण्याच्या संकल्प आमदार राजू कारेमोरे यांनी व्यक्त केला.

मोठा उद्योग धंदा सुरू करू : खासदार प्रफुल पटेल

लाडक्या बहिणीनी आमच्या हातावर बांधलेले हे बंधाचे ऋण आयुष्य भर विसरणार नाही,दादांच्या वतीने खात्री देतो कि जी मागणी राजू कारेमोरे यांनी केली ती पुर्ण करू १९९१ मध्ये पहिल्यांदा लोकसभेत गेलो तेव्हा बावनथडी प्रकल्प, सोंड्या टोला लिफ्ट एरीकेशन, कृषीचे वीज माफ केले. शेतकऱ्यांना आता दिवसा विज मिळणार आहे. १२ गावांना पाणी मिळणार असून संपुर्ण भंडारा जिल्हा सिंचना खाली आणू निधिची कमतरता भासू देणार नाही. दिशाभूल होवु देऊ नका विरोधकांची काय क्षमता आहे. काम करणाऱ्या माणसाची ओळखं ठेवा. या मतदारसंघात मोठा उद्योग आणू. यावेळी प्रफुल्ल पटेल यांना बोलताना शरद पवार यांची आठवण आली. अजित दादा जो पर्यंत आहे तो पर्यन्त विकासा करिता काहीच कमी पडू देणार नाही.अशी ग्वाही याप्रसंगी खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

मुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे तुमसर येथे सकाळी ११.३० वाजता हेलिकॉप्टरने आगमन झाले. त्यानंतर त्यांची शहरातून रॅली काढण्यात आली. एस एन मोर कॉलेज, जुना बस स्थानक, नवीन बस स्थानक विनोबा भावे बायपास मार्ग या चौकात अजित दादा पवार यांचे जंगी स्वागत जेसीबी च्या मदतीने फुलांच्या वर्षाव करण्यात आला. तांबी चौक बावनकर चौक सुभाष चौकात नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर नेहरू शाळेजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सभास्थळी ते दाखल झाले.

खात्यात पैसे जमा झाले का?

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी उपस्थित महिलांना लाडक्या बहिणीचा निधी मिळाला काय अशी विचारणा केली तेव्हा महिलांनी होय निधी मिळाला असे उत्तर दिले.

Related posts