गोंदिया: रेल्वे स्थानकावर सुरू होणार “कोच रेस्टॉरेंट”, खा.प्रफुल पटेल यांच्या पाठपुराव्याचे फलित

890 Views
गोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या प्रवाशांसह रेल्वे परिसरातील नागरिकांना स्वादिष्ट व्यंजनाचा आश्वाद घेता यावा, या अनुसंगाने खा.प्रफुल पटेल यांनी रेल्वे प्रशासनाकडे रेस्टॉरेंट सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला होता. दरम्यान दक्षिण-पूर्व रेल्वे मंडळातील इतवारी, गोंदियासह छिंदवाडा या रेल्वेस्थानकावर रेल्वे कोच रेस्टॉरेंट सुरू करण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडून निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे.
रेल्वे प्रवाशांना सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात व रेल्वेचा प्रवास सोयीस्कर व्हावा, या अनुसंगाने रेल्वे प्रशासनाकडून  रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणावर विशेष लक्ष दिले जात आहे. गोंदिया स्थानकावरील आवागमन करणारे प्रवासी व सामान्य नागरिकांना इतर सुविधांसह रेस्टॉरंट सारखी सुविधा मिळावी ही बाब माजी आमदार राजेंद्र जैन यांनी खा. प्रफुल पटेल यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानुरूप गोंदिया रेल्वेस्थानकांचा कायापालटासह कोच रेस्टॉरंटचे निर्माण केले जाणार आहे.
त्याचबरोबर सर्वसामान्यांना प्रवाशामध्ये होणारी अडचण दूर करण्यासाठी स्लीपर व सर्वसाधारण कोच वाढविण्याचाही निर्देश देण्यात आले आहेत. त्या अनुसंगाने सर्वसाधारण व वातानुकूलित कोच तयार केले जात आहेत. याशिवाय रेल्वेचा प्रवास अधिक सोयीस्कर व्हावा, यासाठी खा.प्रफुल पटेल यांनी दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे झोनमध्ये येत असलेल्या रेल्वेस्टेशन मधील सोयी-सुविधा वाढविण्यात यावे, यासाठी रेल्वे मंत्रालयाशी पाठपुरावा केला.
यानुरूप रेल्वे प्रशासनाकडून इतवारी, गोंदिया व छिदवाडा या तीन रेल्वे स्थानकावर रेल्वे कोच रेस्टॉरेंट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुसंगाने निविदाही प्रसिध्द करण्यात आली आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांसह परिसरातील नागरिकांनाही स्वादिष्ट भोजन रेल्वे फलाटावर उपलब्ध होणार आहे. रेल्वे कोच रेस्टॉरेंट करीता रेल्वे प्रशासनाकडून संबधित स्थानकावर जागा नियोजित करण्यात आली आहे.

Related posts