प्रफुल पटेल मित्रपरिवारा तर्फे श्रीराम नामाचा गजर, श्रीराम नामाच्या जयघोषाने दुमदुमले गोंदिया शहर

264 Views

 

प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्त गोंदिया शहरात विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रम

गोंदिया: बहुप्रतिक्षित राम मंदिरात काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. या सोहळ्यानिमित्त गोंदिया शहरातही खासदार श्री प्रफुल पटेल मित्र परिवाराच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत गोंदिया शहरात पार पडलेल्या कार्यक्रमात सर्वत्र रामनामाचा गजर करण्यात आला. या निमित्त गोंदिया शहर श्रीराम नामाच्या जयघोषाने दुमदुमले होते. अयोध्यातील राम मंदिरात प्रभू श्रीराम मूर्ती ची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

या शुभमुहूर्ताच्या पर्वावर गोंदिया शहरही भक्तिमय वातावरणात नाहून निघाले होते. प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे गोंदिया वासी थेट प्रक्षेपणाचे साक्षी व्हावे यासाठी शहरात कालिखा चौक येथे LED (एलईडी) लावण्यात आले होते. शहरातील रामक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी झाले.

याप्रसंगी माजी आमदार राजेंद्र जैन यांनी प्रभू श्री रामजी ची पूजा, अर्चना व आरती केली व सर्व रामभक्ताचें स्वागत केले. यानंतर ढोल ताशा च्या निनादांमध्ये माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत गोंदिया शहारात राम यात्रा काढण्यात आली.

राम यात्रीने गोंदिया शहरात भ्रमण केले. दरम्यान शहरातील शिव शक्ति दुर्गा माता मंदिर, कुड़वा लाइन, देशबन्धु वार्ड, सियाराम मंदिर, जगदम्बा धाम मंदिर, दुर्गा मंदिर, हनुमान मंदिर, सिताराम मंदिर, श्री मनोकामना सिद्धि रामदरबार मंदिर फुलचुर, मामा चौक व विविध मंदिरांमध्ये आरती व पूजा, अर्चना करण्यात आली. त्यानंतर दुपारी तीन वाजता कालेखा चौकात राम भक्त संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात चंद्रशेखर दमाहे व त्यांच्या संचाने रामचरित मानस व संगीतमय भक्ती गीत सादर करून उपस्थित रामभक्तांना मंत्रमुग्ध केले. सायंकाळी फटाक्यांची भव्य आतिषबाजी करण्यात आली. खासदार श्री प्रफुल पटेल मित्रपरिवारासह गोंदिया शहरातील सर्व रामभक्त सहभागी झाले होते.

यानंतर महाआरती चे आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार श्री राजेंद्र जैन, श्री निखिल जैन व मित्रपरिवार यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती सोहळा अत्यंत भक्ती भावात पार पडला. महाप्रसाद वितरणाने मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे समापन करण्यात आले या दिवसभर चाललेल्या धार्मिक कार्यक्रमात खासदार प्रफुल पटेल मित्रपरिवारातील व रामभक्त मोठया संख्येने उपस्थित होते.

Related posts