उद्या (5ता.)लाखनीत माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

312 Views

 

आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर, वृद्धाश्रम व दिव्यांगशालात साहित्य वाटप..

प्रतिनिधी.
भंडारा : माजी राज्यमंत्री तथा भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्या वाढदिवसानिमित्त लाखनी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री फुके यांचा हा ४३ वा वाढदिवस आहे. यावर्षी ते त्यांचा वाढदिवस लाखनी येथील त्यांच्या निवासस्थानी साजरा करणार आहेत. शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ते सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजता लाखनी निवासस्थानी उपस्थित राहणार आहेत.

त्यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचा भव्य कार्यक्रम लक्ष हॉस्पिटल व फुके फॅन्स क्लब भंडारा जिल्हा यांच्या वतीने गुरुकुल ITI च्या पटांगण, कृउबास समोर, नेशनल हाईवे रोड, लाखनी येथे सकाळी 10 ते 2 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. वृद्धाश्रम व अपंग शाळांमध्येही साहित्य वाटप, फळ वाटप आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

याशिवाय गोंदिया शहरातील गरजू रुग्णांना ब्लँकेट व फळे वाटपासह अन्य कार्यक्रमही डॉ.परिणय फुके मित्र परिवार व दोन्ही जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांनी आयोजित केले आहेत.

Related posts