प्रतिनिधि। 8 डिसंबर
नागपूर। आज (8डिसेंबर) नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान खा.प्रफुल पटेल यांनी राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, अन्न, नागरी पुरवठा मंत्री, महाराष्ट्र शासन यांना भेटून शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेली नुकसान भरपाई व डीबीटी च्या माध्यमातून बोनस स्वरूपात मदत करावी यासंबंधी चर्चा केली.
यावर्षी नोव्हेंबर, डिसेंबर महिन्याच्या सुमारास अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर्व विदर्भातील धनपिक आणि कडधान्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानीचा मोबदला देण्यात यावा, तसेच यावर्षी डीबीटी च्या माध्यमातून शेतकऱ्यांना 25000 रु हेक्टरी मदत जाहीर करावी, यासंदर्भात मा. खा. प्रफुल पटेल, यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात मा. ना. एकनाथ शिंदें, मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन, मा. ना. देवेंद्र फडणविस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन. मा. ना. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन, तसेच मा. ना. छगन भुजबळ, अन्न, नागरी पुरवठा मंत्री, महाराष्ट्र शासन यांना भेटून चर्चा केली व निवेदन दिले. यावेळी आ. मनोहर चंद्रिकापुरे, आ. राजू कारेमोरे, आ. विनोद अग्रवाल, आ. विजय रहांगडाले, माजी आमदार राजेंद्र जैन, माजी आमदार गोपालदास अग्रवाल, सुनील फुंडे, अध्यक्ष, बिडीसीसी, आदी मान्यवर उपस्थित होते.