डॉ.परिणय फुके यांच्या प्रयत्नामुळे भंडारा जिल्ह्यातील 914 घरांना मंजुरी…

455 Views

 

घरबांधणीसाठी 12 कोटी 35 लाख रु. या निधीला शासन मान्यता प्राप्त…

प्रतिनिधी. 8 डिसेंबर
भंडारा. जिल्ह्यातील साकोली, भंडारा आणि तुमसर विधानसभा मतदारसंघातील गरजूंना त्यांच्या स्वप्नांचे घर मिळावे, यासाठी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत/घरकुल योजनांतर्गत विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या घटकांना मोफत घर देण्याची मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन केली होती. आणि यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.

डॉ. फुके यांच्या मागणीवरून शासनाने भंडारा जिल्ह्यातील या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी त्वरीत प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी भंडारा यांना दिले होते.

भंडारा जिल्ह्यातून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत 914 घरे मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आली होती, त्यामध्ये शासनाने आज 8 डिसेंबर 2023 रोजी घरकुले मंजूर करून त्यांच्या बांधकामासाठी 12 कोटी 35 लाख 78 हजार रुपयांचा निधी खर्च करण्यास मान्यता दिली आहे.

याबाबत माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके म्हणाले की, घरकुल बांधकामाच्या पहिल्या टप्प्यासाठी भंडारा जिल्ह्याला तीन कोटी रुपयांचा निधी दिला आहे. त्यामुळे गरजू लाभार्थ्यांचे स्वप्नातील घर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याच्या विकासासाठी राज्य सरकार प्रत्येक स्तरावर सकारात्मक काम करत आहे. या लोककल्याणकारी निर्णयाबद्दल डॉ. फुके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.

Related posts