गोंदिया: पोलीस मुख्यालयात पोलिस स्मृति दिना निमित, कर्तव्य पार पाडतांना वीरमरण आलेल्या 188 शहीद पोलीस जवानांना मानवंदना अर्पण

716 Views

 

गोंदिया। पोलीस स्मृतीदिन – 2023 कार्यक्रमानिमित्त कर्तव्य करीत असताना देशातील आणि राज्यातील शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व पोलीस जवान या हुतात्म्यांना दिनांक- 21 ऑक्टोबर 2023 रोजी कवायत मैदान, पोलीस मुख्यालय, कारंजा गोंदिया येथे शोक सलामी देवून मानवंदना, श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी गोंदिया मा. श्री चिन्मय गोतमारे, व पोलीस अधिक्षक गोंदिया मा. श्री. निखिल पिंगळे, यांनी तसेच कार्यक्रमास उपस्थितांनी शहीद झालेल्या पोलीसांचे स्मरणार्थ पोलीस हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली…

सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी गोंदिया मा. श्री. चिन्मय गोतमारे , यांनी पोलीस स्मृतीदिनानिमित्त संबोधीत करुन *शहीद पोलीस अधिकारी व जवान यांच्या प्रति भावपुर्ण श्रध्दांजली आहे.* *ज्यांनी वेळोवेळी कर्तव्य पथावर अग्रेसर असताना लोकतंत्र रक्षणार्थ आपल्या जीवाची पर्वा न करता* *” आपला आज” देशवासीयांच्या “उद्यासाठी” हसत खेळत स्वतःचे प्राण अर्पण केलेला आहे.* त्याचाच एक भाग म्हणुन 21 ऑक्टोबर हा दरवर्षी भारतभर पोलीस स्मृतीदिन म्हणून साजरा करण्यात येत असल्याचे सांगुन पोलीस स्मृती दिनानिमित्त थोडक्यात संदेश वाचवून दाखविले. ..

21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस प्रशासनासाठी अत्याधिक महत्वाचा आहे. यावर्षी देखील दिनांक 01 सप्टेंबर 2022 ते 31 ऑगस्ट 2023 या कालावधीत संपुर्ण भारतामध्ये आपले कर्तव्य बजावित असताना शहीद झालेल्या एकुण 188 पोलीस अधिकारी व जवानांची नावे सहायक पोलीस निरीक्षक श्री.तुषार काळेल व पोलीस उप- निरीक्षक श्री. श्रीकांत हत्तीमारे, यांनी वाचून दाखविले. शोक सलामी परेड मध्ये गोंदिया जिल्हा पोलीस दलातील प्लाटुन कमांडर पोउपनि- विजयकुमार पुंडे, पो.स्टे. तिरोडा व अंमलदार तसेच भारत राखीव बटालीयन- 2, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया येथील प्लाटुन कमांडर पोउपनि श्री नरेंद्र परिहार व त्यांच्या अंमलदारांसह रापोनि गोंदिया श्री रमेश चाकाटे यांनी शहीद पोलीस स्मृतीदिन सलामीचे नेतृत्व करुन शहीदांना शोक सलामी देण्यात आली व सलामी परेड मधील पोलीस अंमलदारांकडुन प्रत्येकी तीन राऊंड हवेत फायर करण्यात आले.

सदरचे आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी गोंदिया मा. श्री. चिन्मय गोतमारे, पोलीस अधिक्षक गोंदिया मा. श्री. निखिल पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया श्री. सुनिल ताजणे, पोलीस निरीक्षक तथा अति कार्य. पोलीस उप-अधीक्षक (मुख्या) श्रीमती. योगिता चाफले, भारत राखीव बटालीयन-२, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 15 गोंदिया येथील समादेशक सहायक श्री. कैलास पुसाम व सहायक समादेशक श्री कमलकांत सिंग तसेच इतर गोंदिया जिल्हा पोलीस दलातील अधिकारी/ अंमलदार, शहीद झालेल्या पोलीसांचे कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते….

सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन सेवानिवृत्त शिक्षिका- श्रीमती मंजुषी देशपांडे मॅडम, गुरुनानक शाळा गोंदिया यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरिता पोलीस निरीक्षक रापोनि श्री रमेश चाकाटे, सफौ रोशन उईके, पोहवा युवराज किरसान, राजेश पटले (फोटोग्राफर) नैलेश शेंडे, राज वैद्य, राजु डोंगरे, नापोकॉ वसीम शेख तसेच पोलीस मुख्यालय गोंदिया येथील डी. आय. स्टाफ यांनी अथक परिश्रम घेतले.

Related posts