गोंदिया: शासकीय आधारभूत धान केंद्र तत्काळ सुरू करा-  सरपंच नरेंद्र चौरागड़े

289 Views

दिवाळी सण जवळ येऊण ही धान केंद्र सुरू नाही..

गोरेगाव – २१ ऑक्टोबर
यावर्षी वरून राजाच्या कृपेने मोठ्या प्रमाणात पाऊस पडला असुन हलक्या जातीच्या धानाची कटाई व मळणी सुरू झाली आहे. मात्र राज्य शासनाने अद्याप शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू न केल्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना आपले मेहनतीने पिकविलेल्या धान खाजगी व्यापारीना कवडीमोल भावात विकावे लागत आहे व शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावा लागत आहे.
त्यामुळे शासनाने तत्काळ आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करावे अशी मागणी गोरेगाव तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष, आणि मोहाडी चे सरपंच नरेंद्र कुमार चौरागडे यांनी केली आहे.
ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी धान पिकांची कापणी व मळणी जोमात सुरू केली आहे पण धान खरेदी केंद्र चा काहीच पत्ता नाही ग्रामीण भागात प्रामुख्याने धानाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते कारण कि या भागात शेतकरी बांधव मोठ्या संख्येने आहेत त्याचा मुख्य व्यवसाय शेती आहे.
दरवर्षी धान उत्पादक शेतकरी अनेक संकटात सापडतो यावर्षी तर पुरपरिस्थती व अनेक रोगांचा प्रादुर्भाव धान पिकावर झाला तरी देखील शेती मशागतीकरिता खाजगी, सरकारी बॅकाकडुन पिक कर्ज, सोने तारण व उसने-उधार करून शेतकरी शेती करतो एवढे करून सुद्धा शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे व हक्काचे धान विक्री करण्यासाठी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र उपलब्ध नसतील तर धान कुणाला विकावा असा गंभीर प्रश्न धान उत्पादक शेतकरी बांधवांना पडला आहे.
त्यामुळे नाईलाजास्तव शेतकऱ्यांना खाजगी व्यापारीना कवडीमोल भावाने धान विक्री करावा लागतो.
हलक्या जातीच्या धानाची कटाई व मळणी जोमात सुरू असल्याने शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र तत्काळ सुरू करावे जेणेकरून धान उत्पादक शेतकरी बांधवांना यावर्षीची दिवाळी सण अंधारात जाणार नाही व खाजगी व्यापार्याकडुण होणारी पिवळणुक व आर्थिक लुट थांबवावी या करिता शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र तत्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी गोरेगाव तालुका सरपंच संघटनेचे

Related posts