पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा गोंदिया जिल्हा दौरा

767 Views

 गोंदिया, दि.16 : अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम हे 18 ऑक्टोबर 2023 रोजी जिल्ह्याचे दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

सकाळी 8.45 वाजता अहेरी येथून हेलिकॉप्टरने बिरसी विमानतळ गोंदिया कडे प्रयाण. सकाळी 9.45 वाजता बिरसी विमानतळ गोंदिया येथे आगमन व रावणवाडी पोलीस ठाण्याकडे प्रयाण.

सकाळी 10 वाजता रावणवाडी पोलीस ठाणे येथे आगमन व रावणवाडी पोलीस ठाण्याच्या इमारतीचे उद्घाटन तसेच पोलीस दलास चारचाकी वाहनांच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती.

सकाळी 11.15 वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया कडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता शासकीय विश्रामगृह गोंदिया येथे आगमन. सकाळी 11.30 ते दुपारी 12.45 पर्यंत स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांच्या भेटीकरीता राखीव.

दुपारी 12.45 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया कडे प्रयाण. दुपारी 1.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे आगमन व जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती. दुपारी 3.30 वाजता बिरसी विमानतळ गोंदिया कडे प्रयाण. दुपारी 3.45 वाजता बिरसी विमानतळ गोंदिया येथे आगमन व हेलिकॉप्टरने अहेरी कडे प्रयाण करतील.

Related posts