गोंदिया: महिलांच्या गळ्यातील सोन्याची चैन जबरीने ओढुन चोरी करणारा आरोपी पोलिसाच्या ताब्यात..

1,129 Views
प्रतिनिधि। 4 ऑक्टोबर
गोंदिया। 03 ऑक्टोबर रोजी चे रात्रि आठ  वाजता दरम्यान फिर्यादी वंशीका जितेन्द्र कगवानी रा. सिंधी कॉलोनी, गोंदिया ही तसेच त्यांची वहीनी रात्री जेवन केल्यानंतर पायी फिरत असतांनी खालसा धाबा समोर एक अनोळखी मोटार सायकल चालकाने फिर्यादीचे विरूध्द दिशेने जवळ येवुन तिचे गळ्यातील सोन्याची चैन जबरीने ओढुन चोरी केल्याने फिर्यादी ही जोराने ओरडल्याने रस्त्याने जाणे-येणाऱ्या साध्या वेशातील पोलीसांनी त्यास पकडला होता.
 पोलिस द्वारे पकडूंन त्यांच्या नाव पत्ता विचारले असता त्याने आपले नाव- नौमीत कबीर सोनवाने वय 20 वर्ष, रा. गौशाला वार्ड, गोंदिया असे सांगीतले.
त्याची अंगझडती घेतली असता त्याचे पँटचे खिशातून जबरी चोरी केलेली सोन्याची चैन वजन अंदाजे 10 ग्रॅम किंमती अंदाजे- 60,000/- रू. मिळुन आल्याने फिर्यादी यांचे तक्रारी वरून पो.स्टे. गोंदिया शहर येथे अपराध क्रं.653/2023 कलम 392 भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
विशेष बाब अशी की, पोशि सुभाष सोनवाने हे साप्ताहीक रजेवर असतांना खालसा ढाबा येथे परीवारासह आले होते. महीलेचे ओरडण्याचे आवाज आल्याने पोशि सुभाष सोनवाने हे मदतीस धावुन त्यांनी तात्काळ तत्परतेने आरोपी नामे नौमीत कबीर सोनवाने वय 20 वर्ष, रा.गौशाला वार्ड, गोंदिया यास अटक करून सोन्याची चैन वजन अंदाजे 10 ग्रॅम किंमती अंदाजे 60 हजार रू. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेले आहे. सदर गुन्हयाचा तपास सपोनि सागर पटील पो.स्टे. गोंदिया शहर हे करीत आहे.
सदरची कारवाई निखील पिंगळे, पोलीस अधिक्षक, गोंदिया, अशोक बनकर, अपर पोलीस अधिक्षक, गोंदिया, संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गोंदिया शहरचे पोलीस निरिक्षक चंद्रकांत सुर्यवंशी, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे स.पो.नि. सागर पाटील, पो. हवा. जागेश्वर उईके, कवलपालसिंग भाटीया, सुदेश टेंभरे, सतिश शेंडे, प्रमोद चव्हाण, दिपक रहांगडाले, मपोहवा. रिना चौव्हाण, पोशि. दिनेश बिसेन, सुभाष सोनवाने, मुकेश रावते, कुणाल बारेवार, अशोक रहांगडाले, यांनी केली.

Related posts